शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कौस्तुभ गावडे यांना पसंतीक्रमांक १ चे मत देऊन विजयी करा!
schedule17 Oct 26 person by visibility 17 categoryराजकीय
*सुजय विखे पाटील यांचे शिक्षक मतदारांना आवाहन; कोल्हापुरात भव्य प्रचार मेळावा उत्साहात संपन्न*
कोल्हापूर : शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आणि शिक्षण क्षेत्राचा बुलंद आवाज विधान परिषदेत पोहोचविण्यासाठी भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांना पसंतीक्रमांक १ चे मत देऊन बहुमताने विजयी करा, असे आवाहन मा. सुजय विखे पाटील यांनी केले. महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती आणि कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने आयोजित भव्य प्रचार मेळाव्यात ते बोलत होते. हा मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
मा. सुजय विखे पाटील म्हणाले की, महाराष्ट्राच्या शैक्षणिक जडणघडणीत साळुंखे कुटुंबीयांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेला आदर्श, जपलेली शैक्षणिक मूल्ये आणि समाजाभिमुख कार्याचा वसा व वारसा कौस्तुभ गावडे पुढे घेऊन जात आहेत. शिक्षकांच्या समस्या समजून घेऊन त्या शासनदरबारी प्रभावीपणे मांडण्यासाठी सक्षम आणि अभ्यासू प्रतिनिधी विधान परिषदेत जाणे आवश्यक आहे. कौस्तुभ गावडे हे शिक्षकांच्या प्रश्नांसाठी निश्चितच प्रभावी पाठपुरावा करतील, असा विश्वास व्यक्त करून त्यांनी शिक्षक मतदारांनी गावडे यांना पसंतीक्रमांक १ चे मत देऊन विजयी करण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती आणि कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या पुढाकाराने आयोजित या मेळाव्यात शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, शैक्षणिक क्षेत्रातील विविध आव्हाने आणि शिक्षकांच्या न्याय्य मागण्या शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची आवश्यकता यावर भर देण्यात आला. शिक्षकांच्या हक्कांसाठी ठामपणे भूमिका घेणारे नेतृत्व विधान परिषदेत असावे, ही भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, शिक्षक नेते दादासाहेब लाड, माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे, संजय डवर आणि प्रसिद्ध वक्ते मधुकरदादा पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. तसेच मोहरे हायस्कूल, मोहरे आणि आदिवासी शिक्षक संघटनेने आपल्या 1000 शिक्षकांसह कौस्तुभ गावडे यांना जाहीर पाठिंबा दिला.
या मेळाव्यास प्राचार्य अभयकुमार साळुंखे, कोजिमाशीचे तज्ज्ञ संचालक व शिक्षक नेते दादासाहेब लाड, माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे, बहुजन शिक्षक पतसंस्थेचे नंदू कांबळे, बाबा पाटील, दत्ता पाटील, सुरेश संकपाळ, संदीप पाटील, एम. आर. पाटील, दीपक पाटील, मनोहर पाटील, अशोक हुबळे, शिवाजी कोरवी, माजिद पटेल, डॉ. डी. एस. घुगरे, एम. एन. पाटील, बाळ डेळेकर, अनिल चव्हाण, मदन निकम, आनंदा चव्हाण आणि संजय डवर यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिक्षकांचे प्रश्न, त्यांचे हक्क आणि शिक्षण क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य देणारे नेतृत्व विधान परिषदेत पाठविण्याच्या उद्देशाने आयोजित या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यामुळे कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला बळ मिळाल्याचे चित्र दिसून आले.