Awaj India
Register
Breaking : bolt
आदर्श शिक्षिका व प्रेरणादायी जीवनप्रवास : सौ. श्रीदेवी समाधान खिलारे २५ वर्षांचा शिक्षण व समाजसेवेचा प्रदीर्घ प्रवास : प्रा. मनीषा बाबासाहेब कणसे -पाटील यांचे प्रेरणादायी कार्यआदर्श शिक्षिका व समाजसेविका तेजस्वीनी संजय सिंह देसाई यांचे प्रेरणादायी कार्यसामाजिक बांधिलकीतून आदर्श कार्य; अनंतमती विशाल शेटे यांचे उल्लेखनीय योगदानमैत्री दुनियेतील राणी – रूपाली पाटीलडी. वाय. पी. साळोखेनगर मध्ये रविवारी "सतेज मॅथ्स स्कॉलर" परीक्षेचे आयोजन*डी.वाय. पाटील च्या नव्या तंत्रज्ञानाला पेटंट चुये येथे आज पासून श्री दत्त जयंती सोहळा महापुरुषांचे विचार शालेय अभ्यासक्रमात असावेत : कौस्तुभ गावडे कर्तृत्ववान मुख्याध्यापिका सौ. सुहासिनी उदय कदम यांचा प्रेरणादायी प्रवास

जाहिरात

 

सामाजिक बांधिलकीतून आदर्श कार्य; अनंतमती विशाल शेटे यांचे उल्लेखनीय योगदान

schedule13 Jan 26 person by visibility 11 categoryसामाजिक

कोल्हापूर| प्रतिनिधी
समाजातील दुर्बल घटकांना आधार देणे, शिक्षणातून उज्ज्वल भविष्य घडवणे आणि संस्कारांची बीजे रुजवणे या त्रिसूत्रीवर आधारित सामाजिक कार्याचा आदर्श वस्तुपाठ अनंतमती विशाल शेटे या देत आहेत. सन २०१९ पासून त्या सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
“लहान मुले म्हणजे उद्याचे भविष्य” या दृढ विचारातून जैन समाजातील लहान मुलांसाठी कोणतेही शासकीय अथवा खासगी अनुदान न घेता धार्मिक शिक्षण व उत्तम संस्कार देण्याचे कार्य त्यांनी सुरू केले आहे. संस्कारशाळा, धार्मिक मूल्यांची ओळख, नैतिक शिक्षण यांद्वारे मुलांमध्ये शिस्त, सदाचार आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्यावर विशेष भर दिला जात आहे.
यासोबतच शकुंतला महावीर शेटे चारिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनंतमती शेटे यांनी आपत्तीच्या काळातही सामाजिक कर्तव्य बजावले. कोरोना महामारीच्या कठीण काळात तसेच महापूर संकटादरम्यान गरीब व गरजू कुटुंबांना अन्नधान्य, जीवनावश्यक साहित्य व मदतीचा हात देण्यात आला. संकटाच्या वेळी थेट गरजूंंपर्यंत पोहोचून केलेली मदत अनेक कुटुंबांना दिलासा देणारी ठरली.
शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. कसबा सांगावसह इतर गावांतील शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, पेन, शालेय साहित्य वाटपाचे कार्य सातत्याने सुरू आहे. गरिबीमुळे शिक्षणात अडथळा येऊ नये, हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
निस्वार्थ सेवा, सातत्यपूर्ण कार्य आणि समाजहिताचा ध्यास यामुळे अनंतमती विशाल शेटे यांचे कार्य केवळ मदतीपुरते मर्यादित न राहता प्रेरणादायी ठरत आहे. समाजातील विविध स्तरांतून त्यांच्या कार्याबद्दल समाधान आणि कौतुक व्यक्त होत असून, त्यांच्या पुढील उपक्रमांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes