Awaj India
Register
Breaking : bolt
आदर्श शिक्षिका व प्रेरणादायी जीवनप्रवास : सौ. श्रीदेवी समाधान खिलारे २५ वर्षांचा शिक्षण व समाजसेवेचा प्रदीर्घ प्रवास : प्रा. मनीषा बाबासाहेब कणसे -पाटील यांचे प्रेरणादायी कार्यआदर्श शिक्षिका व समाजसेविका तेजस्वीनी संजय सिंह देसाई यांचे प्रेरणादायी कार्यसामाजिक बांधिलकीतून आदर्श कार्य; अनंतमती विशाल शेटे यांचे उल्लेखनीय योगदानमैत्री दुनियेतील राणी – रूपाली पाटीलडी. वाय. पी. साळोखेनगर मध्ये रविवारी "सतेज मॅथ्स स्कॉलर" परीक्षेचे आयोजन*डी.वाय. पाटील च्या नव्या तंत्रज्ञानाला पेटंट चुये येथे आज पासून श्री दत्त जयंती सोहळा महापुरुषांचे विचार शालेय अभ्यासक्रमात असावेत : कौस्तुभ गावडे कर्तृत्ववान मुख्याध्यापिका सौ. सुहासिनी उदय कदम यांचा प्रेरणादायी प्रवास

जाहिरात

 

२५ वर्षांचा शिक्षण व समाजसेवेचा प्रदीर्घ प्रवास : प्रा. मनीषा बाबासाहेब कणसे -पाटील यांचे प्रेरणादायी कार्य

schedule13 Jan 26 person by visibility 14 categoryसामाजिक

कोल्हापूर:
वाटेगाव (ता. आष्टा) येथील प्रा. मनीषा बाबासाहेब कणसे -पाटील या गेली २५ वर्षे शिक्षण, समाजसेवा व महिला सशक्तीकरणाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या त्या आर्टस् कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज, आष्टा येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
त्यांनी B.A. (इतिहास–मराठी), M.A. (मराठी–हिंदी), B.Ed. (मराठी–हिंदी) अशी शैक्षणिक पात्रता मिळवली असून MS-CIT, टेलरिंग डिप्लोमा, शिवणकाम, भरतकाम, मेहंदी, ड्रायव्हिंग, NCC (C कॅम्प), योगा आदी विविध अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. वक्तृत्व, पाठांतर व भाववाचन या क्षेत्रातही त्या पारंगत आहेत.
महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी बचत गटांच्या माध्यमातून मार्गदर्शन, प्रशिक्षण व उद्योग उभारणीसाठी मदत केली आहे. महिलांसाठी विविध उपक्रमांचे प्रभावी आयोजन करून अनेक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
आरोग्य, स्वच्छता, रक्तदान, अवयवदान जनजागृती, करिअर मार्गदर्शन, बालविवाह प्रतिबंध, व्यसनमुक्ती, NSS उपक्रम, होम मिनिस्टर स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम यांचे त्यांनी यशस्वी आयोजन केले आहे.
‘संतपूजा – संत संग , तसेच पंढरपूर व इतर तीर्थक्षेत्री कार्यक्रमांचे आयोजन, गावपातळीवर पंचक्रोशीतील विविध उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
दरवर्षी ८०० ते १००० संतांच्या सहभागाने धार्मिक व सामाजिक कार्यक्रम आयोजनात त्यांचा मोलाचा वाटा असून विद्यार्थिनी व महिलांसाठी सहली, नववधू दर्शन, मार्गदर्शन शिबिरे यांचेही त्यांनी नेतृत्व केले आहे.
शिक्षक म्हणून ज्ञानदान आणि समाजसेविका म्हणून परिवर्तनाची जिद्द — असा प्रा. मनीषा बाबासाहेब कणसे -पाटील यांचा प्रवास आजच्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes