Awaj India
Register
Breaking : bolt
आदर्श शिक्षिका व प्रेरणादायी जीवनप्रवास : सौ. श्रीदेवी समाधान खिलारे २५ वर्षांचा शिक्षण व समाजसेवेचा प्रदीर्घ प्रवास : प्रा. मनीषा बाबासाहेब कणसे -पाटील यांचे प्रेरणादायी कार्यआदर्श शिक्षिका व समाजसेविका तेजस्वीनी संजय सिंह देसाई यांचे प्रेरणादायी कार्यसामाजिक बांधिलकीतून आदर्श कार्य; अनंतमती विशाल शेटे यांचे उल्लेखनीय योगदानमैत्री दुनियेतील राणी – रूपाली पाटीलडी. वाय. पी. साळोखेनगर मध्ये रविवारी "सतेज मॅथ्स स्कॉलर" परीक्षेचे आयोजन*डी.वाय. पाटील च्या नव्या तंत्रज्ञानाला पेटंट चुये येथे आज पासून श्री दत्त जयंती सोहळा महापुरुषांचे विचार शालेय अभ्यासक्रमात असावेत : कौस्तुभ गावडे कर्तृत्ववान मुख्याध्यापिका सौ. सुहासिनी उदय कदम यांचा प्रेरणादायी प्रवास

जाहिरात

 

आदर्श शिक्षिका व प्रेरणादायी जीवनप्रवास : सौ. श्रीदेवी समाधान खिलारे

schedule13 Jan 26 person by visibility 9 categoryसामाजिक

कोल्हापूर
नेपतगाव येथे जि. प. प्राथमिक शाळा, नेपतगाव येथे गणित–विज्ञान विषयाच्या शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या सौ. श्रीदेवी समाधान खिलारे यांचा जीवनप्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. एम.एस्सी., बी.एड. असे उच्च शिक्षण घेत त्यांनी प्राथमिक शिक्षण क्षेत्रात गुणवत्तापूर्ण अध्यापनाची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सौ. श्रीदेवी यांचा जन्म खडकीसारख्या एका छोट्या व साध्या खेड्यात झाला. त्या काळात घरची परिस्थिती अतिशय सामान्य होती. शिक्षणाच्या सुविधा मर्यादित, तर दैनंदिन जीवन कष्टाचे होते. अशा परिस्थितीत वाढताना कष्ट, संयम, शिस्त आणि साधेपणा हे मूल्य त्यांच्या व्यक्तिमत्त्वात घट्ट रुजले. परिस्थितीशी झगडत शिक्षण पूर्ण करत त्यांनी अध्यापन क्षेत्राची वाट निवडली.
गणित व विज्ञान हे विषय विद्यार्थ्यांना भीतीचे वाटतात; मात्र सौ. श्रीदेवी यांनी आपल्या नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धती, सोप्या उदाहरणे, प्रयोगशीलता आणि विद्यार्थीकेंद्रित दृष्टिकोनातून हे विषय रुचकर व समजण्यास सुलभ करून दाखवले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत शैक्षणिक गुणवत्तेसोबतच संस्कार, जिज्ञासा व आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात.
आज आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या या दीर्घ कष्टमय प्रवासाला योग्य सन्मान मिळाला आहे. हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या परिश्रमांचा, संयमाचा आणि शिक्षणासाठी दिलेल्या निःस्वार्थ सेवेचा गौरव आहे. त्यांचा जीवनप्रवास विशेषतः ग्रामीण भागातील मुली, माता आणि नवोदित शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, साध्या परिस्थितीतूनही जिद्द, मेहनत आणि सातत्य ठेवले तर मोठे यश मिळवता येते, याचे ते जिवंत उदाहरण आहेत.
त्यांच्या या सन्मानाबद्दल शिक्षणक्षेत्रातून तसेच ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes