रोखठोक भूमिका आणि जनसंपर्काचे जिवंत व्यक्तिमत्त्व : सचिन सर्जेराव पाटील चुयेकर
schedule20 Jan 26 person by visibility 83 categoryराजकीय
कोल्हापूर :
्चुये, (ता. करवीर) येथील लहानशा कुटुंबात वाढलेले सचिन सर्जेराव पाटील आज आपल्या कर्तृत्वाने आणि रोखठोक भूमिकेने समाजात एक स्वतंत्र ओळख निर्माण करत आहेत. साध्या परिस्थितीतून घडत गेलेला सचिनचा प्रवास हा अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
सचिन पाटील सध्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात (एस.टी.) वाहक म्हणून कार्यरत आहेत. गारगोटी आगारामध्ये काम करत असताना त्यांच्या प्रभावी जनसंपर्क कौशल्यामुळे त्यांना विविध जबाबदाऱ्या आणि पदांवर काम करण्याची संधी मिळाली. प्रवासी, सहकारी कर्मचारी तसेच अधिकारी वर्गातही ते विश्वासाचे आणि आपुलकीचे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.
नोकरीसोबतच गावातही त्यांनी नेहमीच सेवा संस्था व मंडळांच्या माध्यमातून सक्रिय सहभाग घेतला. समाजहिताच्या प्रश्नांवर स्पष्टपणे मत मांडणे, अन्यायाविरोधात आवाज उठवणे आणि सर्वसामान्यांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवणे ही त्यांची खास ओळख आहे. त्यांच्या रोखठोक आणि निर्भीड भूमिकेमुळेच ते आज सर्वसामान्यांमध्ये अत्यंत प्रिय बनले आहेत.
“सर्वसामान्यांची भूमिका काय असते आणि ती कशी मांडली पाहिजे” हे सचिन पाटील यांनी केवळ बोलून नव्हे तर कृतीतून सातत्याने दाखवून दिले आहे. कुठलाही गाजावाजा न करता सामान्य माणसाच्या बाजूने उभे राहणारा हा स्वभाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळी उंची देतो.
आज सर्वसामान्यांची बाजू ठामपणे मांडणाऱ्या, सामाजिक भान जपणाऱ्या आणि मनमिळावू स्वभावाच्या सचिन पाटील यांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांना मनःपूर्वक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या हातून असेच समाजहिताचे कार्य घडो, त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक व्यापक व्हावे आणि आयुष्यात त्यांना उत्तम आरोग्य, यश व समाधान लाभो, हीच सदिच्छा. 🌸🎉