राजारामपुरीत साकारणार महाराष्ट्राची लोकसंस्कृती
schedule27 Aug 25 person by visibility 164 categoryउद्योग
राजारामपुरीत साकारणार महाराष्ट्राची लोकसंस्कृती
राजारामपुरी येथील सहाव्या गल्लीतील तांत्रिक देखाव्यासाठी सुप्रसिद्ध असणाऱ्या राजारामपुरी जय शिवराय तरुण मंडळ यांनी यंदाही आपले वेगळेपण जपत महाराष्ट्राची लोकसंस्कृती: वासुदेव हा हलता भव्य तांत्रिक देखावा साकार केला आहे गेले आठ दिवस सदर देखावा जोडण्याचे काम अहोरात्र सुरू आहे महाराष्ट्राला समृद्ध लोककलांचा वारसा लाभला आहे. पन्नास साठ वर्षांपूर्वीच्या गावगाड्यात लोककलावंतांना आदराचं आणि मानाचं स्थान होते. खेड्याची सकाळ या लोककलावंतांच्या आगमनाने प्रसन्न व्हायची.मंडाळाने यंदा मंडपातच खेडेगाव बसवले आहे जुन्या काळातील खेडेगावातील घरे हुबेहुब बनवली आहेत यामध्ये काही घरे दुमजली देखील आहेत.भल्या पहाटे उठून महिला जात्यावर दळण दळत आहेत. त्यांच्या भावस्पर्शी ओवीनं कुटुंबातील लहान मुलं डोळे चोळत आईच्या मांडीवर येऊन बसायची. शेतकरी राजाची जनावरांना चारापाणी घालून शेतावर जाण्याची लगबग सुरू आहे. महिला आपल्या घराच्या दारात अंगणात स्वच्छता करत
आहेत. दुसरी महिला आपले धान्य पाकडत आहे.त्याच वेळी
दारात टिल्लम टिल्लम टाळ वाजवीत वासुदेवाची स्वारी हजर होते, डोक्याला मोरपिसांची टोपी, घोळदार अंगरखा, काखेत झोळी, कमरेला शेला, त्यामध्ये खोवलेली बासरी, कपाळाला व कानाला टिळा, गळ्यात कवड्याची माळ, पायात घुंगराचे चाळ, हातात चिपळ्या आणि टाळ अशा वेशातला वासुदेव गावात येतो महिला त्याला घरातील धान्य दान स्वरूपाचा देतात वासुदेव तीस फूट फिरत गावातील प्रत्येकाच्या दारात जातो. दुसऱ्या बाजूला एक महिला सकाळी आपल्या तुळशी वृंदावनाची पूजा करून आपल्या दिवसाची सुरुवात करताना दिसून येते तर दुसऱ्या एका घराच्या अंगणामध्ये दोन महिला उखळामध्ये मुसळाच्या साह्याने धान्य सडताना दाखवले आहेत. बरोबर शेतकऱ्याचे असणारे पशुधन गाय बकरी कोंबड्या बैल अगदी हुबेहूब उभे केले आहेत व सर्व मुर्त्या हलत्या आहेत काही घरांवर माकडे बसलेले आहेत. देखावा पाहताना आपल्यासमोर आपण त्या गावातच येऊन उभे आहोत असा भास होत आहे.साडेतीन मिनिटांचा असून बहुतांशी हालचाली इलेक्टीक मोटर पंपवर होणार असून आत्ता पासून गल्लीमध्ये देखाव्याचे जोड काम पाहण्यास गर्दी होत आहे लहान मुलांपासून वयोवृध्दापर्यंत देखाव्याचे आकर्षण असणार आहे यंदाच्या वर्षी आज पर्यतचे सर्व गर्दीचे उच्चांक मोडला जाईल असे मंडळाचे कार्यवाहक धनराज माने,कार्याध्यक्ष विनित कागले अध्यक्ष तेजस जगताप उपाध्यक्ष मीत कागले सचिव धनंजय गाडगीळ यांनी सांगितले आजपर्यंत राजारामपुरी जय शिवराय तरुण मंडळाने विविध सामाजिक प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे देखावे सादर केले आहेत याबद्दल विविध पुरस्काराने म्हणाला गौरवण्यात आले आहेत.