Awaj India
Register
Breaking : bolt
जिल्हास्तरीय युवा पुरस्कार; ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ* कुडीत्रे येथे ‘तालुकास्तरीय पौष्टिक तृणधान्य कार्यशाळा’ उत्साहात संपन्न**डी. वाय. पाटील आर्किटेक्चरचा* *'ऊर्जा कार्यक्षम बस स्टॉप' प्रथम*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना* *’एसएई इंडिया बाहा’ मध्ये १० पुरस्कार* -*डी वाय पाटील अभियांत्रिकीमध्ये* *'वूमन इन लीडरशिप' कार्यक्रम उत्साहात*सामाजिक कार्यकर्त्या स्नेहल जाधव यांना 'जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीरशिये येथील राजश्री सातपुते यांना 'जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीरसहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल निता रेपे यांना 'आदर्श जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीरसमाजसेविका सुनिता उदाळे यांना 'आदर्श जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीरफार्मासिस्ट पुनम कोरे यांना 'आदर्श जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीर

जाहिरात

 

स्वखर्चातून उभारलेले महामाता भिमाई–रामजी आंबेडकर स्मारक सामाजिक बांधिलकीचे प्रतीक

schedule22 Jan 26 person by visibility 552 categoryसामाजिक

कोल्हापूर
इन्कमटॅक्स विभागातून निवृत्त झालेले क्रीडापटू व बॉडीबिल्डर तसेच सामाजिक कार्यात सक्रिय असलेले संदेश सावळाराम जाधव (रा. वात्सल्या सोसायटी, रूम नं. १०२, पहिला माळा, कोयनवेळे, घोटकॅम्प, पेज २, तळोजा) यांनी सामाजिक बांधिलकी जपत बाबासाहेब डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ उभारलेले जगातील पहिले महामाता भिमाई–रामजी आंबेडकर स्मारक आज आठ वर्षांचा टप्पा ओलांडत आहे.
२०१८ साली जाधव यांनी हे स्मारक स्वखर्चाने व स्वतःच्या जमिनीवर उभारले. २०१९ मध्ये या स्मारकाचे भव्य उद्घाटन बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू दिलिप राव मुकुंदराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. तेव्हापासून हे स्मारक सामाजिक प्रबोधनाचे केंद्र ठरत आहे.
महामाता भिमाई यांनी दिलेल्या संस्कारांमुळेच बाबासाहेब घडले, अशी भावना व्यक्त करत जाधव हे माध्यमांतून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सामाजिक जागृती करत आहेत. “भिमाई यांनी बाबासाहेबांना जन्म दिला नसता तर आज भारतीय संविधान, शिक्षण, नोकरी व हक्कांची संकल्पना कशी असती?” असा प्रश्न उपस्थित करत ते महामाता भिमाई यांचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवत आहेत.
स्वतःच्या निवृत्तीनंतरही गरजूंना मदत, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन आणि विचारप्रसाराचे काम सातत्याने सुरू ठेवणारे संदेश जाधव यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांनी केलेल्या या स्मारकनिर्मितीमुळे महामाता भिमाई व रामजी आंबेडकर यांच्या योगदानाला योग्य सन्मान मिळत असून, पुढील पिढीसाठी ही एक महत्त्वाची वारसा-स्थळ बनत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes