आदर्श माजी सैनिक रोहित कृष्णदेव कदम यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय
schedule22 Jan 26 person by visibility 16 categoryसामाजिक
आदर्श माजी सैनिक रोहित कृष्णदेव कदम यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय
देशसेवेला आयुष्याचा ध्यास मानणारे माजी सैनिक रोहित कृष्णदेव कदम यांनी सैन्यात असताना राष्ट्रसेवेत मोलाचा सहभाग नोंदवला आहे. सैनिकी सेवेनंतरही त्यांनी समाजसेवेला प्राधान्य देत आपला सामाजिक प्रवास अविरत सुरू ठेवला आहे.
समाजातील गरजू, पीडित व मदतीसाठी हाक देणाऱ्यांसाठी ते नेहमीच तत्पर असतात. सामाजिक सैनिक म्हणून ओळख मिळवलेल्या रोहित कदम यांनी थॅलेसीमिया निर्मूलन असोसिएशन तसेच अन्य सामाजिक संस्थांच्या माध्यमातून रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळोवेळी मदत केली आहे. त्यांच्या या कार्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचले असून समाजात सकारात्मक संदेश पोहोचला आहे.
देशसेवा आणि समाजसेवा या दोन्ही क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत विविध सामाजिक संस्थांकडून त्यांचा सत्कार व गौरव करण्यात आला आहे. राष्ट्रासाठी आणि समाजासाठी झटणारे रोहित कृष्णदेव कदम हे आजच्या युवकांसाठी एक प्रेरणादायी आदर्श व्यक्तिमत्त्व ठरत आहेत.