विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी समर्पित कार्य : संकल्प चॅरिटेबल ट्रस्ट आणि दक्षिना स्कूलचा प्रेरणादायी प्रवास
schedule22 Jan 26 person by visibility 19 categoryसामाजिक
कोल्हापूर
मुंबईतील गोरेगाव (पश्चिम) येथे कार्यरत असलेली दक्षिना स्कूल फॉर स्पेशल लर्नर्स आणि संकल्प चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर ही संस्था गेल्या २४ वर्षांपासून विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करत आहे. या संस्थेच्या संचालिका मिस वाघमारे ज्योत्स्ना सुखदेव या एक अनुभवी विशेष शिक्षिका (Special Educator) असून त्यांनी विशेष शिक्षण, मानसिक समुपदेशन व उपचारात्मक शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
ही शाळा प्री-प्रायमरी ते सेकंडरी स्तरापर्यंत विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमातून शिक्षण देते. आत्मनिर्भर पद्धतीने चालणाऱ्या या शाळेला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) मंडळाची मान्यता आहे.
शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता
मिस ज्योत्स्ना वाघमारे यांनी मुंबई विद्यापीठातून कला शाखेतील पदवी (B.A.) प्राप्त केली असून दिल्ली विद्यापीठातून विशेष शिक्षण (मानसिक अपंगत्व) विषयातील डिप्लोमा पूर्ण केला आहे. तसेच ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, मल्टी-सेंसरी थेरपी, अकॅडमिक लँग्वेज थेरपी, चाइल्ड सेंटर्ड अप्रोचेस यासारख्या विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय प्रशिक्षणांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. सध्या त्या अमेरिकेतील मल्टी-सेंसरी इन्स्टिट्यूटकडून थेरपी अभ्यासक्रमही सुरू आहेत.
विशेष उपक्रम व सेवा
संस्थेच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी व उपचारात्मक उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये—
कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम : विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी पालक, शाळा, रुग्णालये व संस्थांच्या सहकार्याने सेवा.
ऍक्टिव्हिटी क्लब : उन्हाळी, दिवाळी व ख्रिसमस शिबिरांद्वारे सामाजिक, मानसिक व शारीरिक विकास.
चाइल्ड गाईडन्स सेंटर : पालक व मुलांसाठी शिकण्याच्या अडचणी, वर्तन समस्या व मानसिक आरोग्यावर मार्गदर्शन.
रिसोर्स सेंटर : कुटुंबे, शिक्षक व केअरगिव्हर्ससाठी माहिती, प्रशिक्षण व समुपदेशन सेवा.
ट्रेनिंग आणि डेव्हलपमेंट प्रोग्राम : शिक्षक, पालक, डॉक्टर, नर्स, समुपदेशक व स्वयंसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा.
तज्ज्ञांची मजबूत टीम
संस्थेमध्ये मानसोपचारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, विशेष शिक्षक, फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट, क्लिनिकल डायटिशियन, बिहेवियर थेरपिस्ट, कला व नृत्य थेरपिस्ट, तसेच प्रशिक्षित क्रीडा प्रशिक्षकांची अनुभवी टीम कार्यरत आहे.
समाजासाठी आशेचा किरण
विशेष गरजा असलेल्या मुलांनाही समाजाच्या मुख्य प्रवाहात आत्मविश्वासाने उभे करता येते, हा विश्वास घेऊन दक्षिना स्कूल आणि संकल्प चॅरिटेबल ट्रस्ट सातत्याने कार्य करत आहेत. शिक्षणासोबतच उपचार, समुपदेशन व कौशल्यविकास यांचा सुंदर संगम या