Awaj India
Register
Breaking : bolt
*डी वाय पाटील अभियांत्रिकीमध्ये* *'वूमन इन लीडरशिप' कार्यक्रम उत्साहात*सामाजिक कार्यकर्त्या स्नेहल जाधव यांना 'जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीरशिये येथील राजश्री सातपुते यांना 'जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीरसहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल निता रेपे यांना 'आदर्श जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीरसमाजसेविका सुनिता उदाळे यांना 'आदर्श जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीरफार्मासिस्ट पुनम कोरे यांना 'आदर्श जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीरकर्तव्यनिष्ठेचा सन्मान: दिपाली पाटील यांना 'आदर्श जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीरडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा* *मंगळवारी 14 वा दीक्षांत समारंभ*महिला दिनाचे औचित्य साधत एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा राज्यस्तरीय शुभारंभ*रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा! भुदरगडमधील आरोग्य सेविका दीपाली पाटील

जाहिरात

 

उत्कृष्ट समाजसेविका मा. राणी मॅडम

schedule29 Jan 26 person by visibility 476 categoryसामाजिक

कोल्हापूर : 
 गेल्या दहा वर्षांपासून राणी मॅडम या सातत्याने सामाजिक कार्यात सक्रिय असून, शाहू–फुले–आंबेडकर विचारधारेवर आधारित कार्यातून समाजातील दुर्बल, गरजू व वंचित घटकांना आधार देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी उभारले आहे.
मा. राणी मॅडम यांच्या नेतृत्वाखाली विविध धम्म परिषदांचे आयोजन, नियोजन व सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत. गरजू रुग्णांसाठी वैद्यकीय मदत, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहाय्य व मार्गदर्शन, महिलांसाठी समुपदेशन व आधारकार्य, तसेच आपत्ती व अडचणीच्या काळात तत्काळ मदतकार्य—अशा बहुआयामी उपक्रमांतून त्यांनी समाजहित जपले आहे.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे गुगवाड येथील धम्मभूमी बुद्ध विहाराच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी एक हजार महिलांना तीन दिवसांसाठी निवास व्यवस्थेसह सहभागी करून घेतले. याशिवाय, कोल्हापूर जिल्ह्यातील विविध गावांमध्ये बौद्ध पौर्णिमा तसेच दर रविवारी महिलांना व मुलांना बौद्ध विहारांमध्ये धम्मकार्याचे प्रशिक्षण व माहिती देण्याचे कार्य त्या सातत्याने करत आहेत. लेणी संवर्धन व लेणी बचाव कार्यक्रमांअंतर्गत विविध सहलींचे आयोजन व नियोजन त्या स्वतः वेळ देऊन करत असतात, हेही त्यांच्या कार्यातील आणखी एक महत्त्वाचे योगदान आहे.
या सर्व कार्यात प्रसिद्धी, फोटो किंवा जाहिरात यांपेक्षा प्रत्यक्ष कृतीला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. निःस्वार्थ भावनेने आणि ठाम सामाजिक बांधिलकीतून केलेले त्यांचे कार्य अनेक कुटुंबांना आधार देणारे, समाजात सकारात्मक बदल घडविणारे व प्रेरणादायी ठरत आहे.
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes