+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustविकास कामाच्या 'ऋतू' मध्ये निधीचा 'अमल' न झाल्याची टीका adjustशाहुवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात विनय कोरे यांची डोकेदुखी वाढणार adjustशाही दसरा महोत्सवानिमित्त शुक्रवारी पारंपरिक वेशभूषा दिवस* adjustपुढील पाच वर्षात आणखी जोमाने काम करणार : आ. जयश्री जाधव adjustलोकसभेचे विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी शुक्रवारपासून *दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर* adjustहळदी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बाजीराव चौगले adjustराज्यातील गरजूंपर्यंत प्रबोधनातून शासकीय योजनाही पोहोचवाव्यात- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* adjustकिरण लोहार यांचा सन्मान adjustमहात्मा गांधीजी जयंती निमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजुषा adjust नागपूरच्या महिला दूध उत्पादकांची ‘गोकुळ’ ला भेट...
schedule06 Oct 24 person by visibility 78 categoryराजकीय

कोल्हापूर (प्रशांत चुयेकर) 

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात आ. ऋतुराज पाटील यांनी विकास काम केले असल्याचे निधीचा फलक झळकवला. विकासकामे झाली नाही निधीचा नेमका 'अमल"कुठे केला असा सवाल माजी आमदार अमल महाडिक यांनी करत डिजिटल वार सुरू केले आहे.

आमदार पाटील यांनी गतवेळच्या विधानसभा मतदार संघात 40 हजार पेक्षा अधिक मते घेत निवडणूक जिंकली. प्रत्येक गावात विकास कामाचा निधी दिला असल्याचा फलक लावला. दक्षिण मतदार संघातील प्रत्येक गावात काय विकास काम केली याचा लेखाजोखाच आमदार ऋतुराज पाटील यांनी फलकाच्या माध्यमातून मांडला आहे.
या डिजिटल फडकाला तोडीस तोड म्हणून माजी आमदार अमल महाडिक यांचे सुद्धा डिजिटल फलक झळकत आहेत. गावात विकास कामे केली नाहीत मग निधी गेला कुठे असा प्रश्न विचारत आमदार ऋतुराज पाटील यांच्या फलकाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. 
लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण मध्ये 40,000 चे लीड कमी करत सहा हजार पर्यंत आणण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीने करण्यात आलेला आहे. या विधानसभा निवडणुकीत हा टप्पा पार करून विजय संपादन करू असा विश्वास भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीत जिल्हाभर लक्ष असल्याकारणाने दक्षिणमध्ये अधिक मते मिळवण्यास कमी पडलो असल्याची कबुली देत आता लक्ष घालून पूर्वीपेक्षा जास्त मताधिक्यांनी विजय होऊ असा विश्वास सुद्धा आमदार पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.