Awaj India
Register
Breaking : bolt
चळवळ टिकण्यासाठी एकत्र येणे गरजेचे ; उत्तम कांबळेअण्णा ब्रिगेडचे संस्थापक डॉ.अमोल महापुरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा*पंचगंगा प्रदूषण प्रश्न उद्योजकांची बैठक घेऊन प्रश्न सोडवणार : आबिटकरनदी प्रदूषण प्रश्नी प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा : माणगावेडॉ. डी. वाय. पाटील कृषि महाविद्यालयाच्या* *दोन माजी विद्यार्थ्यांची अन्न व प्रशासन विभागात निवड*डी. वाय पाटील कृषी विद्यापीठाच्या* *13 विद्यार्थ्यांची डी - मार्टमध्ये निवड*डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक टाटा मोटर्स पुणे यांच्या कॅम्पस इंटरव्यू संपन्न*शिलेदार हायकर्स फाउंडेशनतर्फे मोफत शालेय बँगचे वाटपनदी प्रदूषित करणाऱ्यांच्यावर कारवाई करावीविमानतळ भूसंपादन प्रकियेतील बाधित कुटुंबांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक तातडीने करा;

जाहिरात

 

चळवळ टिकण्यासाठी एकत्र येणे गरजेचे ; उत्तम कांबळे

schedule04 Feb 25 person by visibility 36 categoryसामाजिक

कोल्हापूर;

आंबेडकरी चळवळ टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, आपला शत्रू कोण आहे हे ओळखून आपल्या लोकांना बळकट देण्याचे काम करायला हवे तरच जवळ टिकणार आहे असे परखड मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांनी व्यक्त केल.
उत्तम दादा कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी विविध उपक्रमाचे आयोजन केले आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून आवाज इंडियाशी औपचारिक गप्पात ते बोलत होते.

समाजाची साथ हवी
अन्याय झाले की समाजाला चळवळीच्या नेत्यांची आठवण येते. अन्याय दूर झाला की पुन्हा ते चळवळीच्या नेत्यांना विसरतात अशी खंत व्यक्त करत दादा यांनी चळवळीच्या पाठीशी कायम राहिले तरच विचारधारा टिकणार असल्याचे सांगितले. चळवळीच्या कार्यकर्त्यांना घरात समाजात व प्रस्थापित लोकांच्याकडून कायम दुर्लक्षित केले जाते. त्यांची अवहेलना केली जाते. कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता निवळ सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी चळवळीतील कार्यकर्ते काम करत असतात. याची दखल समाज घेत नसेल तर मात्र चळवळीचं नुकसान होणार आहे. समाजातील लोकांनी साथ दिली पाहिजे अशी अपेक्षा उत्तम दादा यांनी व्यक्त केली.


तरुणांनी बाबासाहेब समजून घ्यावा

आजचे तरुण विविध योजनेचा लाभ घेतात मात्र विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घेत नाही. समाजातील सर्वच तरुणांनी बाबासाहेब समजून घेतले तर चळवळीला बळकटीकरण मिळणार आहे. महिन्यातून दोन ते चार वेळा व्याख्यानमाला झाली पाहिजे. महापुरुष समजून घेतले तरच चळवळ टिकणार आहे. तरुणांनी चळवळीत आलं पाहिजे आजची तरुण चळवळीत दिसत नाहीत याची खंत सुद्धा उत्तम दादा यांनी व्यक्त केली.


प्रस्थापितांना ताकद दाखवायला हवी

निवडणूक आली की प्रस्थापित लोक आपल्या जवळ येतात. विविध आश्वासन देऊन शांत बसतात. आपली एकी नसल्यामुळे त्यांना ताकद दाखवता येत नाही त्यामुळे विविध पदापासून वंचित राहावे लागते. आंबेडकरी चळवळ प्रस्थापितापासून दूर आहे. त्यांना विविध पदापासून दूर ठेवले जाते. अशी खंत सुद्धा दादा यांनी व्यक्त केली.

हीच वेळ चळवळीची ताकद दाखवण्याची
आंबेडकरी समाज विविध अडचणींना तोंड देत आहे. या अडचणीवर मात करायची असेल तर हीच वेळ आहे एकत्र येण्याची अन्यथा भविष्यात होणाऱ्या नुकसानीला आपणच जबाबदार असेल. चळवळ टिकवण्यासाठी हीच वेळ एकत्र यायची आहे अशी अपेक्षा दादा यांनी व्यक्त केली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes