शाहुवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात विनय कोरे यांची डोकेदुखी वाढणार
schedule04 Oct 24 person by visibility 993 categoryराजकीय
कोल्हापूर (प्रशांत चुयेकर)
शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे विद्यमान आमदार कोरे यांची डोकेदुखी वाढणार आहे. महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील सरूडकर यांच्या महाविकास आघाडीतून सुद्धा इच्छुक पुढे सरसावले आहेत.
महायुतीमध्ये जनसुराज पक्षाने पाठिंबा दिल्यामुळे आमदार विनय कोरे यांनाच उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे. मात्र शिंदे शिवसेना, भाजप, अण्णा ब्रिगेड यांच्याकडून विनय कोरेच्या मतावर फटका बसू शकतो.
भाजपच्या राज्यसचिव डॉक्टर स्वाती पाटील, शिंदे सेनेचे जिल्हा सचिव ओमकार चौगुले तर अण्णा ब्रिगेड मधून डॉक्टर अमोल महापुरे यांनी या विधानसभा मतदारसंघात विकास कामे केली आहेत.
स्वाती पाटील यांनी संजीवनी महिला संघटनेच्या वतीने मतदार संघात आपले जाळे तयार केले आहे. हा मतदारसंघ भाजपला मिळाल्यास डॉक्टर पाटील मॅडम यांचे नाव आघाडीवर असेल असेही कार्यकर्त्यांच्या मधून बोलले जाते.
डॉक्टर महापुरे यांनी या मतदारसंघातील गावागावात दलित व युवक वर्गात संपर्क वाढवलेला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून ओमकार चौगुले घराघरात पोहोचले आहेत. या मतदारसंघाची जागा शिवसेनेची आहे जागा मिळाल्यास लढू असेही शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. महायुतीचा उमेदवार म्हणून कोरे यांना घोषित केले तरी भाजप आणि शिंदे सेना या उमेदवारांना शांत करू शकतात मात्र अण्णा ब्रिगेड डॉक्टर महापुरे ही निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे.
महाविकास आघाडीतून जयंत प्रदीप पाटील यांच्याही कार्यकर्त्यांचे स्टेटस झळकले होते यावरून ते विधानसभेत इच्छुक असावेत असे तर्क बांधले जात आहेत. पाटील व शेकापचे भाई जगताप यांच्यामुळे सत्यजित पाटील सरूडकर यांनाही धोका होऊ शकतो.