+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustपेन्शनसाठी हजारो दिव्यांग आक्रोश मोर्चात सहभागी होणार adjustबालिंगा येथील जूना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद* adjustपूरबाधित नागरिकांसाठी निवारा केंद्राचा प्रस्ताव तयार करा : adjustपाण्यात बसून शिकतायेत पणोरे गावची मुले adjustशिवाजी विद्यापीठाच्या तीन दिवसाच्या परीक्षा पुढे ; भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या मागणीला यश adjustविकसीत भारतासाठी योग्य अर्थसंकल्प adjustविद्यार्थीनींना मिळाली आरोग्य रक्षणाची माहिती adjustखोटी आश्वासने देणारे लॉलिपॉप बजेट! adjustजिल्ह्यातील 78 बंधारे पाण्याखाली* *राधानगरी धरणातून 1500 क्युसेक विसर्ग* adjustराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यादिवशी ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी*
schedule16 Mar 24 person by visibility 72 category
!
‘गोकुळ’ कडून दूध संस्थांना हिरक महोत्सवी भेट व्यवस्थापन खर्चापोटी १० पैसे वाढ - अरुण डोंगळे

चेअरमन गोकुळ दूध संघ  

‘गोकुळचा’ ६१ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा...

 

कोल्‍हापूरः ता.१६. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे (गोकुळ) जिल्ह्यातील प्राथमिक दूध संस्थांच्या व्यवस्थापन खर्चामध्ये प्रतिलिटर १० पैसे व संस्था सचिवांना ५ पैसे वाढीचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. येत्या १ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी होईल.’ अशी घोषणा चेअरमन अरुण डोंगळे यांनी केली. तसेच दूध उत्‍पादक शेतकरी, दूध संस्‍था, व कर्मचारी यांचे सहकार्य मोलाचे असून त्‍यांच्‍या सहकार्यामुळेच गोकुळ २० लाख लिटरचे उध्दिष्‍ठ साध्‍य करेल तसेच असा विश्‍वास संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी गोकुळच्‍या ६१ व्या वर्धापन दिनानिमीत्‍य अमृतसिद्धी हॉल, कळंबा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम मध्ये व्‍यक्‍त केला.

             पुढे बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, दूध संघाची स्‍थापना १६ मार्च १९६३ इ. रोजी ७०० लिटर दूध संकलनावर झाली. आज ७०० लिटर वरुन सध्या प्रतिदिनी सरासरी १७ लाख लिटर दूध संकलन होत आहे. १९८५ साली दूध महापूर (ऑपरेशन फ्लड-आणंद) योजना चालू झाली, सर्वांच्या सहकार्यातून संघाला भरभराटीचे दिवस आलेत.आम्ही केलेल्या आवाहनास सभासदांनी साथ दिल्यामुळे म्हैस दूधाची वाढ चांगल्याप्रकारे झाली आहे. गोकुळ म्हणजेच गुणवत्ता हे समीकरणच बनले आहे. गुणवत्तेच्या जोरावरती गोकुळ राज्यामध्ये प्रथम आहे. महाराष्ट्रात गाय दूध खरेदी दरामध्ये गोकुळ आघाडीवर असून शासनापेक्षा प्रतिलिटर ८ रुपये जास्त दर देत आहे. गोकुळने दूध उत्पादकास सर्वसाधारण ८२ टक्के रक्कमेचा परतावा दिला असून, दूध बिला पोटी दर १० दिवसाला सरासरी ७० कोटी रुपये आदा केले जातात. महाराष्ट्रात सर्वाधिक म्हैस / गाय दूध दर, गाय दूध दर शासन दरापेक्षा ८ रुपये जास्त देत आहोत, म्हैस दूध खरेदीसाठी रुपये ५५.०६ /- व गाय दुधासाठी सरासरी ३७.२६ /- इतका उच्चांकी दर दिला आहे.

             राज्यात सर्वाधिक गाय दूध अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा (रुपये २.५ कोटी), गाय दूध अनुदानासाठी सर्वात जलद गतीने काम करणारा गोकुळ दूध संघ आहे. हिरक महोत्सवी वर्षानिमित्य दूध संस्थांच्या बळकटी करणासाठी १ एप्रिल २०२४ पासून दूध संस्थांना व्यवस्थापन खर्चात प्रतिलिटर १० पैसे व दूध संस्था कर्मचारी यांना प्रोत्साहन पर ५ पैसे वाढ करण्यात येणार आहे. तसेच ‘गोकुळ केसरी’ कुस्ती स्पर्धा भरवणार असल्याचे मनोगत व्यक्त केले.

            यावेळी सन २०२१-२२ ते २०२२-२३ मध्ये जिल्ह्यास्तरीय तसेच तालुकास्तरीय गाय/म्हैस जास्तीत जास्त दूध पुरवठा, म्हैस जास्तीत जास्त दूध पुरवठा, म्हैस उत्तम प्रत दूध पुरवठा, गाय/ म्हैस जास्तीत जास्त दूध पुरवठा(महिला संस्था) दूध संस्थांना, तसेच कोल्‍हापूर, पुणे व मुंबई येथील जास्‍तीत-जास्‍त दूध विक्री करणा-या दूध वितरकांचाही सत्‍कार व बक्षीस वाटप गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व जेष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या हस्ते व सर्व संचालकांच्या उपस्थित करण्यात आले.

            तसेच गाय/ म्हैशी यांच्या उत्तम आरोग्यसाठी नवीन प्रीमियम महालक्ष्मी कोहिनूर डायमंड, महालक्ष्मी टी.एम.आर. मॅश तसेच संघ व उत्पादक संस्थेत पारदर्शकता राहण्यास मदत होण्यासाठी ऑटो मिल्क सॅम्पलर युनिटचे उद्‌घाटन अशा विविध कार्यक्रमानी ६१ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.

            तसेच मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली, गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते केक कापून संघाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे स्‍वागत व प्रास्‍ताविक संघाचे जेष्ठ संचालक विश्‍वास पाटील यांनी केले, तसेच संचालक अजित नरके यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर आभार संचालक शशिकांत पाटील चुयेकर यांनी मानले.

यावेळी गोकुळचे चेअरमन अरूण डोंगळे, जेष्‍ठ संचालक विश्‍वास पाटील, संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बाळासो खाडे, बयाजी शेळके, राजेंद्र मोरे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, दूध संस्था प्रतिनिधी, दूध उत्पादक आदि उपस्थित होते.