Awaj India
Register
Breaking : bolt
शिवाजी भिमाजी परळीकर यांना संविधान प्रसारक आदर्श मूकनायक पुरस्कारचंद्रकांत चषक -२०२५" फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळ व श्री शिवाजी तरुण मंडळ विजयीमच्छिंद्र कांबळे यांना आदर्श मूकनायक पुरस्कारप्रा. प्रमोद झावरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कारडॉ. भाग्यश्री मल्लिकार्जुन पाटील यांना आदर्श शिक्षिका पुरस्कारआरती वैशाली मनोहर कांबळे यांना मूकनायक पुरस्कार कोल्हापूरकोल्हापूर मेडिकल असोसिएशन तर्फे व्यसनमुक्ती अभियानसागर कांबळे यांना आदर्श मूकनायक पुरस्कारप्रा. जितेंद्र भारमगोंडा यांना आदर्श शिक्षक पुरस्कारगायक नामदेव हसुरकर यांना आदर्श मूकनायक पुरस्कार

जाहिरात

 

आरती आर्दाळकर -मंडलिक यांना यावर्षीचा 'आदर्श महिला पुरस्कार'

schedule06 Mar 25 person by visibility 299 categoryआरोग्यसामाजिक

कोल्हापूर;

आरती आर्दाळकर -मंडलिक यांनी शिवाजी विद्यापीठातून  पत्रकारितेची पदवी घेतली आहे. २००० साली कोरोना काळात  लेख लिहिण्यास सुरुवात केली. त्यांचे लेख पुढारी, लोकमत, पुण्यनगरी, तरुण भारत अशा विविध मराठी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होतात. आतापर्यंत सत्तरच्या आसपास लेख प्रसिद्ध झाले आहेत. अमेरिकेतील राजकीय, सामाजिक, महिला, पर्यावरणविषयक तसेच चालू घडामोडींवर  लिखाण केले. पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये 'थेट अमेरिकेतून ' या नावाने सदर चालवले. ज्यामध्ये अमेरिकेतील आरोग्य, शिक्षण , वाहतूक, व्हिसा, वेगवेगळे सण, परंपरा अशा बऱ्याच गोष्टींची ओळख व माहिती आपल्याकडील वाचकांना लेखाद्वारे करून दिली. दिवाळी अंकात लेख असतात. नव्याने सुरु झालेल्या पुढारी वृत्तवाहिनीसाठी मंडलिक यांनी अमेरिकेतील काही घडामोडी कव्हर केल्या आहेत.

अमेरिकेत महिला कशाप्रकारे स्वावलंबी आहेत, त्या कशाप्रकारे स्वतःला घडवितात, त्यांची निर्णय घेण्याची क्षमता, त्यांचा स्वाभिमान, त्यांचे आयुष्य यांवर येत्या काळात लिखाण करायचा मंडलिक यांचा मानस आहे. जेणेकरून आपल्याकडील महिला स्वतःचे स्थान समजू शकतील, स्वतःला महत्व देऊ शकतील. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes