अमृत महोत्सव म्हणायला राज्य आणि केंद्र शासनाला लाज वाटते का
schedule26 Jan 24 person by visibility 176 category

कोल्हापूर (प्रशांत चुयेकर)
75 वे वर्ष म्हटलं की सर्वसामान्य माणसाला, संस्थेला सुद्धा मोठा उत्साह निर्माण होतो आणि 75 वर्षाबद्दल त्याचा वाढदिवस असला तर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अमृत महोत्सव म्हणून त्याचा गाजावाजा केला जातो. भारतीय लोकशाही बळकट करणारे भारतीय संविधान 75 व्या वर्षात पदार्पण करत आहे. राज्य आणि केंद्र शासनाने माध्यमांमध्ये जाहिरात दिली असली तर हे वर्ष अमृत महोत्सव आहे हे म्हणायला त्यांना लाज वाटत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीबा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज अशा पुरोगामी महान व्यक्तींचा आदर्श घेत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती केली.भारतीय संविधान हे देशातील लोकशाही बळकट करण्यासाठी मोलाची कामगिरी बजावते. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा देशाचं कौतुक होतं ते भारतीय संविधानामुळेच. सर्व जाती धर्मातील लोक एकत्र गुण्यागोविंदाने नांदतात. या संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क दिले. हे संविधान 75 व्या वर्षात पदार्पण होत आहे.
हे अमृत महोत्सवी वर्ष आहे हे सांगायला राज्य शासन आणि केंद्र शासनाला लाज वाटत आहे. अमृत महोत्सवी वर्ष गाजावाजा करून साजरे केले जाते.विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार देश सुरू आहे ; असं खोटं सांगत राज्य आणि केंद्रशासन जनतेला फसवत आहे. मनुवादी सरकार आणण्यासाठी हे संविधान बाजूला करण्याचं प्रयत्न केले जात असल्याची टीका सुद्धा विरोधकांच्याकडून होत आहे. हे सत्य आहे याचा उलगडा त्या जाहिरातीमधून दिसत आहे.
सामाजिक परिवर्तनाचा दस्तावेज म्हणून याकडे बघितले जाते.हा दस्तावेज मनुवादी सरकारला मान्य नाही. त्यांना स्त्रियांना गुलामी ठेवायचा आहे,गरिबांना शिकू द्यायचं नाही,पुन्हा हुकूमशाही आणायचे आहे म्हणूनच भारतीय संविधान त्यांना मान्य नाही.अमृत महोत्सवी वर्ष म्हटल्यानंतर आपण जगाला ओरडुन सांगितलं पाहिजे इथं भारतीय संविधानामुळे लोकशाही बळकट आहे.सर्व धर्मातील नागरिक गुण्यागोविंदाने नांदतात.
जय संविधान
9765024443