कोल्हापूर/प्रतिनिधी: पोटच्याचं पोराने शेतीची वाटणी करून दिली नाही या रागातुन पित्यावर धारधार हत्याराने वार केल्याने दत्तु बुधाजी दळवी (वय.65 रा.कळसगादे ता. चंदगड हे जखमीं झाले आहेत. गुरुवारी ही घटना घडली.घटनेच्या काही अवघ्या तासात पोलिसांनी आरोपी शंकर दत्तु दळवी, रुपाली शंकर दळवी यांच्या अटक केली.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शेतीची वाटणी करून दिली नाही यांचा राग मनात धरून दळवी यांच्या पोटच्या मुलाने आणि सुनेने दत्तु बुधाजी दळवी यांना , शेतीची वाटणी करून देणार आहेस की नाही अशी विचारणा करत , दत्तु बुधाजी दळवी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आरोपी आरोपी शंकर दत्तु दळवी, रुपाली शंकर दळवी या दोघांनी घराच्या समोर बाधीत असलेल्या ठिकाणावरून कोयता आणून फिर्यादी दत्तु बुधाजी दळवी यांच्यावर डोक्यावर सपासप वार केले
यामध्ये दत्तु दळवी हे गंभीर जखमी झाले पोलिसांनी काही तासात आरोपी शंकर दत्तु दळवी, रुपाली शंकर यांना अटक केली....