राष्ट्रीय कथास्पर्धेचे पुरस्कार जाहीर
schedule16 Jan 24 person by visibility 467 categoryलाइफस्टाइल
कोल्हापूर : ( युवराज राजीगरे)
:- अक्षरक्रांती फाऊंडेशन, नागपूर व महारुद्र प्रकाशन, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने *बदलते युग: काल आणि आज* या विषयावर नुकतीच ग्रामीण कथालेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
यात महाराष्ट्र, गोवा,मध्यप्रदेश, कर्नाटकसह देशभरातून १२१ कथाकारांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. त्यात *संजीवनी बंदावणे / पांडे, पुणे* यांच्या 'आमराईचे गाव' ही कथा प्रथम पुरस्कारप्राप्त ठरली असून द्वितीय पुरस्काराचा मान *अलकनंदा घुगे / आंधळे, संभाजीनगर* यांच्या 'गोष्ट एका वाडीची' या कथेने पटकावला. तसेच तृतीय पुरस्काराची मानकरी चिंचपाडा, पेण येथील *निता पाटील* यांची 'नांदी' ही कथा ठरली. प्रोत्साहनपर कथेचा मान नाशिक येथील *नंदकिशोर ठोंबरे* यांच्या 'सावी' या कथेला तसेच मुंबई येथील *सुनील कुलकर्णी* यांच्या 'वेगळा विचार' या कथेला मिळाला आहे.
पुरस्काराचे स्वरूप प्रथम ५००० ₹ रोख व सन्मानचिन्ह, द्वितीय ३००० ₹ रोख व सन्मानचिन्ह, तृतीय २००० ₹ रोख व सन्मानचिन्ह तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक १००० ₹ रोख व सन्माचिन्ह असे आहे . १० फेब्रुवारीला गोवा येथील शासकीय महाविद्यालय, साखळीच्या सभागृहात *केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक* यांच्या हस्ते पारितषिक वितरण सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात येईल. सदर आयोजन हे शासकीय महाविद्यालय साखळीच्या मराठी विभागातर्फे करण्याचे ठरले आहे. सदर कथास्पर्धेचे परीक्षण नागपूर येथील ज्येष्ठ कवी, लेखक व समीक्षक *मा. प्रभाकर तांडेकर 'प्रदत्त'* यांनी केले असून ते विद्यार्थांना कथासंदर्भात मार्गदर्शन करतील.
कथास्पर्धेचे आयोजन अक्षरक्रांती फाऊंडेशन नागपूरचे संस्थापक अध्यक्ष *मा. शंकर घोरसे* तथा महारुद्र प्रकाशन गोवाचे *मा. अजय बुआ* यांनी केले होते. स्पर्धेत सहभागी कथाकारांच्या निवडक २५ कथांचा एक *प्रातिनिधिक संग्रह* सुद्धा लवकरच काढण्यात येणार असून सहभागी कथाकारांना पुस्तकाच्या ५ प्रती निःशुल्क भेट देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्याचा मनोदय दोन्ही संस्थेच्या वतीने आयोजकांनी व्यक्त केला आहे. पुढील वर्षीच्या आयोजनाचा व पुरस्कार वितरणाचा सोहळा हा महारष्ट्रात घेण्याचे निश्चित झाले आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याला अधिकाधिक साहित्यिक मंडळींनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.