Awaj India
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या ५५ विद्यार्थ्यांची विविध कंपनीमध्ये निवड**मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका करण्याऐवजी मूळ विषयावर बोलावेकोल्हापूरचे वैशिष्ट दाखविणारा रॅपसाँग ‘कोल्हापूरी तडका’*कार्यालयात वेळेत न येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करा : प्रवीणभाई माणगावेवनस्पतीच्या वाढीसाठी मुळांचे आरोग्य महत्वाचे – प्रा. डॉ. के. प्रथापन* खा.महाडिक यांचा जलशक्ती मंत्र्यांसमोर अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला विरोध राष्ट्रीय क्लासिक पावर लिफ्टिंग स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न*शंभर कोटी रस्त्यांची क्वालिटी चेकअप करणार; आ. सतेज पाटीलवरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणात होणार शिक्षकांची " परीक्षा " किमान 50 % गुण प्राप्त न झालेस करावे लागणार पुन्हा प्रशिक्षण अरुण डोंगळे यांच्या राजीनाम्याचा प्रश्न सामंजशाने सुटेल; आमदार सतेज पाटील..

जाहिरात

 

सागरी साधनसंपत्तीचे संवर्धन

schedule22 Jan 21 person by visibility 1198 categoryलाइफस्टाइल

 

नैसर्गिक पर्यावरणात सागराला विशेष महत्त्व आहे. विविध प्रकारची जैवविविधता सागरामध्ये आढळते. पृथ्वीवरील सागरी भागाचे प्रदुषण हा विषय सध्या चर्चेत आहे. त्यामुळे त्यावर भाष्य होणे अपेक्षित आहे. भौगोलिक पर्यावरणात मानवाने केलेले बदल हे सागरी पर्यावरणाला त्याचबरोबर जैवविविधतेला ही धोकादायक ठरत आहेत. परिणामी सागरी सजीव सृष्टी धोक्यात आली. पृथ्वीवरील जमीन व पाणी यांचे वितरण असमान आहे. पृथ्वीचा 29 टक्के भूभाग हा जमीनीने तर 71 टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. पृथ्वीवर पाण्याने व्यापलेल्या भागाचे क्षेत्रफळ 362.6 दशलक्ष चौरस कि.मी आहे. पॅसिफिक (166.0 द.ल.चौ.कि.मी.), अटलांटिक (86.5 द.ल.चौ.कि.मी.), हिंदी (73.4. द.ल.चौ.कि.मी.), आर्क्टिक (13.2 द.ल.चौ.कि.मी.) हे मोठे महासागर आहेत. भारताच्या प्राकृतिक रचनेचा विचार करता, हिंदी महासागर, अरबी समुद्र व बंगालचा उपसागर मिळून 6100 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे. नैसर्गिक किनारपट्टीवर अनेक बीच व पर्यटन स्थळे निर्माण झालेले आहेत. पर्यटन स्थळी लोकांची गर्दी वाढते. मानवी हस्तक्षेपामुळे किनारी भागातील प्रदुषण ही वाढत आहे. समुद्रात तसेच किनारी प्रदेशात टाकला जाणारा प्लास्टिक कचरा, तेलगळती, दुषित पाणीपुरवठा यामुळे किनारी प्रदेशाचे प्रदुषण वाढत आहे. परिणामी मासे व सागरातील इतर सजीवांना धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे सागरी किनारपट्टीचे प्रदुषण थांबविणे गरजेचे आहे. किनार पट्टीवरील पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन यासाठी पर्यावरण संवर्धन 1986 कायद्या अंतर्गत वन आणि पर्यावरण मंत्रालयाने किनारपट्टी नियमन क्षेत्र 1991 मध्ये जारी केला. त्यामध्ये 2001 मध्ये दुरुस्तीनुसार किनारपट्टी प्रदेशात उद्योग बंदी, मानवी हस्तक्षेप थांबवणे, खारफुटीची जंगले, प्रवाह भित्तिका, सागरी जीवांचे प्रजनन व संरक्षण करणे हे महत्वाचे आहे. सागरी किनारी प्रदेशात मानवी हस्तक्षेप वाढत आहे. दलदलीच्या प्रदेशामधील पक्ष्यांचे अधिवास नष्ट होत आहे. जैवविविधता धोक्यात येत आहे त्यामुळे त्यांचे संवर्धन व व्यवस्थापन करणे हे महत्वाचे आहे.

डाॅ युवराज शंकर मोटे

भूगोल व पर्यावरण अभ्यासक

कोल्हापूर

मो:9923497593

ईमेल:ysmote@gmail.com

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes