Awaj India
Register
Breaking : bolt
कोल्हापूर मंडळात ६,५९२ बूथवर ६.२२ लाखांहून अधिक बालकांना पोलिओ डोसपुण्यसृष्टी प्रकल्प : अतिक्रमण काढण्याचे आदेश *डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरतर्फे* *आजपासून दोन दिवसीय ‘आर्किटेक्चर बूट कॅम्प*माहिती अधिकार नियम २०२६ विरोधात राज्यभर आंदोलनाचा इशारा१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक;* डॉ. महादेव नरके यांचे पुस्तक विद्यार्थी आणि संशोधकांसाठी दिशादर्शक – डॉ. संजय डी. पाटील*डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये* *१२ रुग्णांवर मणक्याच्या यशस्वी शस्त्रक्रिया*नोकरी लावतो म्हणून फसवणूक करणाऱ्याच्यावर कारवाई करा शिरोळ तालुक्यात दुधातील भेसळीचा प्रश्न गंभीर; जनता दल (सेक्युलर) तर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदनइस्पुर्ली पोलिसांची मोठी कारवाई; नंदगावमध्ये छापा

जाहिरात

 

डी.वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये* *स्पर्धा परीक्षाबाबत मार्गदर्शन

schedule16 Mar 24 person by visibility 653 categoryशैक्षणिक


डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय कसबा बावडाच्या उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा क्लबतर्फे एमपीएससी आणि यूपीएससी या विषयावर रिपब्लिक आयएएस अकादमीचे श्री मंगेश जोग यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षा या परीक्षांमधील मूलभूत फरक, पदवीच्या काळात या परीक्षांसाठी अभ्यास करण्याचा रोडमॅप आणि अभ्यासाची रणनीती आणि संदर्भित केले जाणारे मूलभूत संदर्भ साहित्य या विषयांवर श्री जोग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या परीक्षामध्ये यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास, आवांतर वाचन व चालू घडामोडीची माहिती असणे आवश्यक असल्याचे त्यानी सांगितले.

 यावेळी डीन स्टुडन्ट अफेअर डॉ. आर. ए. पाटील, उच्च शिक्षण क्लबच्या समन्वयक प्रा. शोभा पाटील, इव्हेंट ऑर्गनायझर प्रा.निराली गिलबिले व स्पर्धा परीक्षा समन्वयक प्रा. मनजीत जाधव उपस्थित होते.  

    संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतूराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के.गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes