कृष्णराज महाडिक यांना डिजिटल स्टार महागौरव पुरस्कार
schedule28 Jan 24 person by visibility 167 category

कोल्हापूर प्रतिनिधी
असं म्हटले जाते की एका मोठ्या वृक्षाखाली दुसरं झाड वाढत नाहीत. राजकारणाच्या बाबतीत सुद्धा तसच म्हटले जाते की राजकारणाचा वारस असलेली लोक मोठी होण्यास अडचण निर्माण होते. याला अपवाद कृष्णराज धनंजय महाडिक आहेत असं म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही. कारण स्वतःचं वेगळं व्यक्तिमत्व निर्माण करत तरुणाईच्या गळ्यातील ताईत होण्याचे काम त्यांनी केलं आहे. म्हणूनच डिजिटल मीडिया मालक पत्रकार संघटनेच्या वतीने दुसऱ्या अधिवेशनात त्यांचा डिजिटल स्टार महागौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे.
महाडिक यांनी BRDC ब्रिटिश Formula 3 ग्लोबल चॅम्पियनशिप चे पहिले भारतीय विजेते होण्याचा मान मिळवला आहे. एम. कॉम ही उच्च पदवीचे शिक्षण घेत त्यांनी सामाजिक कार्यांमध्ये सहभागी झाल्याबद्दल महाराष्ट्राचे ऑल राऊंडर युथ आयकॉन ही पदवी संपादन केली आहे. युट्युब वर तीन लाखांपेक्षा जास्त सबस्क्राईबर्स, इंस्टाग्राम वर दोन लाख पेक्षा जास्त फॉलोवर्स निर्माण करण्याचे काम त्यांनी केलं आहे.
अनेक मेडिकल कॅम्पस, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान व गरजूंसाठी निवाऱ्याची सोय यांसारख्या अनेक सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार असतो. विविध कार्यक्रम व कॉलेज प्रोग्राम्स येथे मार्गदर्शन व नवीन पिढीला प्रोत्साहन देण्याचे कार्य त्यांनी केले.
वडील खासदार धनंजय महाडिक यांच्या राजकारणातील कामास पाठिंबा व ते राबवत असलेल्या समाजकार्याच्या प्रोजेक्ट्सचे नेतृत्व करत आहेत. दुसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात येणार आहे त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.