+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustपेन्शनसाठी हजारो दिव्यांग आक्रोश मोर्चात सहभागी होणार adjustबालिंगा येथील जूना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद* adjustपूरबाधित नागरिकांसाठी निवारा केंद्राचा प्रस्ताव तयार करा : adjustपाण्यात बसून शिकतायेत पणोरे गावची मुले adjustशिवाजी विद्यापीठाच्या तीन दिवसाच्या परीक्षा पुढे ; भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या मागणीला यश adjustविकसीत भारतासाठी योग्य अर्थसंकल्प adjustविद्यार्थीनींना मिळाली आरोग्य रक्षणाची माहिती adjustखोटी आश्वासने देणारे लॉलिपॉप बजेट! adjustजिल्ह्यातील 78 बंधारे पाण्याखाली* *राधानगरी धरणातून 1500 क्युसेक विसर्ग* adjustराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यादिवशी ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी*
schedule15 Jan 24 person by visibility 448 category

शिवाजी विद्यापीठात होणार सामने : तीन दिवस चालणाऱ्या क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रातून सुमारे १००० खेळाडू होणार सहभागी

कोल्‍हापूर : 

महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत पारेषण कंपनीच्या सन २०२३-२४ या वर्षाच्या आंतर परिमंडलीय क्रीडा स्पर्धा दि. २२ जानेवारी ते २४ जानेवारी २०२४ या कालावधीत शिवाजी विद्यापीठाच्‍या मैदानात संपन्न होणार आहेत. तीन दिवस चालणार्‍या या क्रीडा स्पर्धामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे १००० खेळाडू सहभागी होणार आहेत

यामध्‍ये कबड्डी, व्‍हॉलिबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ, कुस्‍ती, धावणे, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, रिले आदी क्रीडा स्‍पर्धा होणार आहेत. तसेच दि. २३ जानेवारी २०२३ रोजी सांस्‍कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्‍यात आले आहे. 

स्‍पर्धेचे उद्घाटन सोमवार दि.२२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ०९.०० वाजता महापारेषणचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक मा.डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांच्‍या शुभहस्‍ते करण्‍यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलगूरू मा.प्रा.डॉ. डी. टी. शिर्के तसेच महापारेषणचे मा.श्री. संदीप कलंत्री, संचालक (संचलन), मा.श्री.सुनील सुर्यवंशी, संचालक (प्रकल्‍प), मा.श्री.सुगत गमरे, संचालक (मासं) , मा.श्री.अशोक फळणीकर, संचालक (वित्‍त व लेखा), मा.श्री.रोहिदास मस्‍के, कार्यकारी संचालक (संचलन) व मा.श्री. भरत पाटील, मुख्‍य औद्योगिक संबंध अधिकारी यांची प्रमुख उपस्‍थिती राहणार आहेत अशी माहिती सौ.शिल्‍पा कुंभार, मुख्‍य अभियंता, महापारेषण, कराड तथा क्रीडास्पर्धा कार्याध्‍यक्ष व श्री. प्रांजल कांबळे, अधीक्षक अभियंता तथा क्रीडा स्पर्धा सचिव यांनी दिली.