डॉ. शिल्पा सुशांत कुंभार यांना आदर्श महिला पुरस्कार
schedule06 Mar 25 person by visibility 668 categoryशैक्षणिकसामाजिक
कोल्हापूर
राजाराम महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर शिल्पा कुंभार यांना यावर्षीचा आदर्श महिला पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. आठ मार्च रोजी शाहू स्मारक भवन येथे पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.
शाहूपुरी, कुंभार गल्लीतील शिल्पा कुंभार यांना शिवाजी विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी 'द कोरेलेशनल स्टडी ऑफ पर्सनॅलिटी, ऑप्टीमिस्टीक पेसिमिस्टीक अॅटिट्यूट, इंटरपर्सनल कम्युनिकेशन स्कील अँड यूथ प्रॉब्लेम्स अमंग कॉलेज स्टुडंटस्' (व्यक्तिमत्त्व, आशावादी-निराशावादी, दृष्टिकोन, आंतरवैयक्तिक संप्रेषण कौशल्य आणि युवा समस्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवरील सहसंबंधात्मक अभ्यास) हा शोधप्रबंध सादर केला होता. संशोधनातून निराशावादी युवकांत व्यक्तिमत्त्व समस्या अधिक तर आशावादी युवकांत व्यक्तिमत्त्व समस्या कमी दिसतात, असे स्पष्ट झाले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देण्यात येत आहे.