Awaj India
Register
Breaking : bolt
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कधी भरपाई देणार**डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये* *शनिवारी ‘डायबेटिक फूट’वर परिषद*अतिसार थांबवा अभियान’ प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी अमोल येडगे*खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचा १०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण* :वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कडून विविध विषयांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा*वनस्पतीच्या वाढीसाठी मुळांचे आरोग्य महत्वाचे – प्रा. डॉ. के. प्रथापन* चुये येथे बेंदूर सण उत्साहात साजरावह्याची मदत गोरगरीब विद्यार्थ्यांच्यासाठी, आभाळा इतकी; डॉ. राजन गवसव्हनाळी उपसरपंचपदी संजयबाबा घाटगे गटाच्या अश्विनी जांभळे यांची निवडट्रिपलसीट व एकेरी मार्ग उल्लंघनावर दोन लाख रुपयांचा दंड वसूल

जाहिरात

 

कोल्हापूरकरांच्या दातृत्वामुळेचं उत्तरेश्वर थाळीच्या माध्यमातून पाच रुपयात गोरगरिबांना अन्न..

schedule07 Sep 21 person by visibility 179 categoryसामाजिक

कोल्हापूर :  आपल्या मातृभूमी चॅरिटेबल ट्रस्ट उत्तरेश्वर थाळीच्या माध्यमातून गेली वर्षभर गोरगरीब आणि गरजवंताला केवळ 5 रूपयांत अन्नदान उपक्रम अखंडीत पणे दररोज सुरू आहे. ह्या उपक्रमास कोल्हापुरातील असंख्य दातृत्वान लोकांच्या सहकार्य व आशिर्वादाने हा उपक्रम आपण यशस्वीपणे राबवला आहे. अन्नपुरवठ्या बरोबर मातृभूमी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेक विविध काळानुसार उपक्रम देखील आपण राबवले आहेत. उदा. पंचगंगा स्मशानभूमीस 4 टन लाकूड दान, लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तब्बल तीन महिने दररोज 500 मुलांना आयुर्वेदिक काढ्याचे वाटप, महापुरात विस्थापित झालेल्या 300 हुन अधिक पुरग्रस्तांची सकाळची चहानाष्टा, दुपारच्या व रात्रीच्या जेवणाची व्यवस्था असे काळाच्या गरजेनुसार राबविले आहेत.  
    
याचाच पुढचा भाग म्हणून आता आपल्या ट्रस्ट मार्फत गरजू आणि होतकरू 100 विद्यार्थ्यांना शैक्षणिकरित्या दत्तक घेणार आहोत. जसे आपले दातृत्व वाढेल तसे आणखी गरजवंतांपर्यंत आपण पोहचवण्याचा प्रयत्न करू व आपण आपल्या संस्थेमार्फत फक्त स्कुलबॅग, वह्या, कंपास, पुस्तके किंवा गणवेश देऊन आमची जबाबदारी संपणार नाही. तर आपण त्या 100 विद्यार्थ्यांची जबाबदारी पालकत्व आपल्या संस्थेशी संलग्न असलेल्या 100 व्यक्तिंना देणार आहोत. हे पालक दर आठवडा किंवा पंधरा दिवसांनी त्या विद्यार्थ्यांची आस्थेवाइकपणे चौकशी करतील व त्यांच्या प्रगतीवर ही लक्ष ठेवतील व यातून ह्या विद्यार्थ्यांची जडण घडण उत्कृष्ट व्हावी असा आमचा मानस आहे. सदर उपक्रमास आपल्या सारखे जागृक दैनिक व पत्रकार तसेच अनेक सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते जोडले जातील अशी आशा आहे.. 

या पत्रकार बैठकीला उपस्थित अध्यक्ष
रवींद्र जाधव ,राजेंद्र चव्हाण,युवराज जाधव,योगिता चव्हाण,किरण शिंदे,सम्राट शिर्के हे उपस्थित होते



जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes