Awaj India
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना* *’एसएई इंडिया बाहा’ मध्ये १० पुरस्कार* -*डी वाय पाटील अभियांत्रिकीमध्ये* *'वूमन इन लीडरशिप' कार्यक्रम उत्साहात*सामाजिक कार्यकर्त्या स्नेहल जाधव यांना 'जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीरशिये येथील राजश्री सातपुते यांना 'जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीरसहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल निता रेपे यांना 'आदर्श जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीरसमाजसेविका सुनिता उदाळे यांना 'आदर्श जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीरफार्मासिस्ट पुनम कोरे यांना 'आदर्श जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीरकर्तव्यनिष्ठेचा सन्मान: दिपाली पाटील यांना 'आदर्श जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीरडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा* *मंगळवारी 14 वा दीक्षांत समारंभ*महिला दिनाचे औचित्य साधत एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा राज्यस्तरीय शुभारंभ*

जाहिरात

 

डी. वाय. पाटील ज्यु. कॉलेजचा* *बारावीचा निकाल ९९.१७ टक्के*

schedule05 May 25 person by visibility 479 categoryशैक्षणिक

कसबा बावडा/ वार्ताहर 
  बारावीचा ऑनलाईन निकाल सोमवारी जाहीर झाला असून डॉ. डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजचा निकाल ९९.१७ टक्के लागला आहे.  
   
विज्ञान शाखेत कौस्तुभ नागवेकर  याने ९२.१७  टक्के गुणासह प्रथम क्रमांक मिळवला आहे. वरद सरोळकर याने ९२.५०  टक्के गुणासह  द्वितीय, वसुंधरा इंगवले हिने ९१.३३ टक्के गुणासह तृतीय, आकांक्षा देशमुख हिने ८८.३३ टक्के गुणांसह चौथा तर मानसी कीर्तानिया हिने ८७.८३ टक्के गुणांसह पाचवा क्रमांक प्राप्त केला आहे. 

 वाणिज्य शाखेत तनया गुळवणी  हिने ९५.८३  टक्के गुणासह प्रथम क्रमांक मिळवला आहे. माहिया मुल्ला हिने ९५.६७ टक्के  गुणासह द्वितीय क्रमांक मिळवला असून तिने अकौंटन्सी विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत.  सई शिंदे हिने ९४.३३  टक्के गुण मिळवत तृतीय स्थान मिळवले. 

  त्याचबरोबर अनघा कुलकर्णी, तनिष्का डोंगळे, मुग्धा पोतदार, जान्हवी ओसवाल, मानसी किर्तानिया, पूर्वा शिंदे या विद्यार्थिनीनी भूगर्भशास्त्र विषयामध्ये मध्ये १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत.

    सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार  सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, महाविद्यालयाचे सल्लागार अशोकराव देसाई, प्राचार्य ए. बी. पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes