Awaj India
Register
Breaking : bolt
दिव्यांग पेन्शनसाठी ‘प्रहार’ आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चादहावीनंतर डिप्लोमा इंजीनियरिंग हा करिअरचा उत्तम पर्याय - डॉ. महादेव नरके*आज डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन*राष्ट्रीय सबज्युनिअर बेसबॉल स्पर्धेकरीता कु.स्वराज रुपेश सागर ची ओडिसा येथे निवडगांधीनगर येथे तंबाखूविरोधी धडक मोहीम ; २७ जणांवर कारवाई ५४०० रुपये दंड वसूलअपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या बदली व पुनर्नियुक्तीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची गर्जना संघटनेची मागणीभाजपचे मनसुबे हाणून पाडणार; 'डीपीआय' उपवर्गीकरण चळवळीचे नेतृत्व करणारइंजिनिअरिंग १३ विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्याची परवानगी:उच्च न्यायालयाचा दिलासा कोल्हापूर खंडपीठाचा अंतरिम आदेशकोल्हापुरात विंचारेमाळ येथे जुगार अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांचा छापा; ११ जणांना अटक, दीड लाखांचा मुद्देमाल जप्तवकिलाला मारहाण प्रकरणी संबंधित पोलिसांवर कारवाई करा; ॲड. तौसिफ शेख यांची मागणी

जाहिरात

 

*डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये* *शनिवारी ‘डायबेटिक फूट’वर परिषद*

schedule19 Jun 25 person by visibility 1140 categoryआरोग्य

कोल्हापूर;
डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्यावतीने शनिवार दि. २१ जून २०२५ रोजी ‘डायबेटिक फूट’वर एकदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. डायबेटिक फूट सोसायटी ऑफ इंडीया (DFSI) यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या चर्चासत्रात नामवंत डॉक्टर्स मार्गदर्शन करणार आहेत.

   भारतामध्ये  मधुमेहाचे प्रमाण वाढत असून त्यामुळे डायबेटिक फूटच्या जखमा, गँगरीन, अपंगत्वच्या समस्या वाढत आहेत.  या सामाजिक व वैद्यकीय प्रश्नाला उत्तर शोधण्यासाठी व कोल्हापूर परिसरातील वैद्यकीय व्यावसायिकांसोबत याबाबतचे अद्ययावत  ज्ञान शेअर करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 

   डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या  सर्जरी, मेडिसिन, अस्थिरोग आणि अनाटॉमी या विभागांनी एकत्र येऊन डायबेटिक फूट सोसायटी ऑफ इंडीया (DFSI) यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेमध्ये मुंबई येथील ख्यातनाम डॉ. अरुण बाळ, डॉ. संजय वैद्य, डॉ. मिलिंद रूके, डॉ. शैलेश रानडे तसेच हैद्राबाद येथील डॉ. श्रीनिवास हे मार्गदर्शन करतील. वैद्यकीय महाविद्यायातील पदव्युत्तर विद्यार्थी व प्राध्यापक यांचाही या चर्चा सत्रात सहभाग असेल.

 डी. वाय. पाटील अभिमत विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र नेर्ली, उपअधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालाप्पा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेसाठी सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती सहयोगी प्राध्यापक डॉ. अमित बुरांडे यांनी दिली. 

कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes