Awaj India
Register
Breaking : bolt
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कधी भरपाई देणार**डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये* *शनिवारी ‘डायबेटिक फूट’वर परिषद*अतिसार थांबवा अभियान’ प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी अमोल येडगे*खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचा १०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण* :वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कडून विविध विषयांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा*वनस्पतीच्या वाढीसाठी मुळांचे आरोग्य महत्वाचे – प्रा. डॉ. के. प्रथापन* चुये येथे बेंदूर सण उत्साहात साजरावह्याची मदत गोरगरीब विद्यार्थ्यांच्यासाठी, आभाळा इतकी; डॉ. राजन गवसव्हनाळी उपसरपंचपदी संजयबाबा घाटगे गटाच्या अश्विनी जांभळे यांची निवडट्रिपलसीट व एकेरी मार्ग उल्लंघनावर दोन लाख रुपयांचा दंड वसूल

जाहिरात

 

डी. वाय. पाटील मेडिकल संघाला विजेतेपद

schedule31 Dec 24 person by visibility 526 categoryक्रीडा


डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा
 
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज संघाने विजेतेपद तर स्कूल ऑफ इंजीनियरिंग आणि मॅनेजमेंटने उपविजेतेपद पटकावले.

 डी. वाय. पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कदमवाडी येथे झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे यांच्या हस्ते झाले. यावेळी क्रीडा संचालक शंकर गोनुगडे, डॉ अक्षय कोकीतकर, प्रा. निखिल नायकवडी, सुशांत कायपुरे, रोहन बुचडे सर्व कॉलेजचे स्पोर्ट्स इन्चार्ज उपस्थित होते.

 अंतिम सामना मेडिकल कॉलेज व स्कूल ऑफ इंजीनियरिंग आणि मॅनेजमेंट या दोन संघात झाला प्रथम फलंदाजी करताना इंजिनिअरिंग कॉलेजचा राज घोरपडे 42 धावा (30 चेंडू) व विवेक जाधवच्या 25 धावांच्या (19 चेंडू) जोरावर स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट ने 20 षटकात ७ गडी  गमावून  132 धावा केल्या. ध्रुव जसवाल (४५) व आदित्य देवल (४३)यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर मेडिकल कॉलेजचे हे आव्हान 19 षटकात पार करत विजेतेपदाला गवसणी घातली.   मेडिकल कॉलेजच्या विक्रमादित्य देशमुख याने उत्कृष्ट गोलंदाजी करत चार षटकात एकूण 26 धावा देऊन दोन गडी बाद केले. 

   कुलपती डॉ. संजय डी पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त मा. आ. ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. 

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes