Awaj India
Register
Breaking : bolt
कुर्डूवाडी-माढा परिसरात शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!*सीएचबी प्राध्यापकांच्या प्रश्नांसाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार: शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे*मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री मुश्रीफ यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही तुमचा आमच्यावर विश्वास नाही का?आम्ही शपथ घेणारच नाही”*पहिल्या फेरीतच कौस्तुभ गावडे यांना विजयी करणार; शिक्षक नेते दादासो लाड यांची स्पष्टोक्ती*शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करणारच: शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांची स्पष्ट भूमिका*सखोल वैद्यकीय ज्ञान घेऊन* *आदर्श डॉक्टर बना- डॉ. संजय डी. पाटील*कराडमध्ये पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ; कौस्तुभ गावडे यांना वाढता पाठिंबा*करवीर तालुक्यातील ठरावधारकांचा छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीला भक्कम पाठिंबा*महायुतीच्या ऐतिहासिक विजयात राधानगरी- भुदरगडचा सिंहाचा वाटा असेल*

जाहिरात

 

डि. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ''नॅक"कडून मानांकन*

schedule19 Jan 25 person by visibility 693 categoryशैक्षणिक

डॉ ए.के. गुप्ता यांची माहिती : पहिल्याच प्रयत्नात पाच वर्षासाठी मानांकन

साळोखेनगर:

 डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या साळोखेनगर येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला 'राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन परिषदे'चे (NAAC) प्रतिष्ठित मानांकन प्राप्त झाले आहे.

हे मानांकन पाच वर्षासाठी म्हणजे डिसेंबर 2029 पर्यंतच्या कालावधीसाठी मिळाले आहे. यामुळे महाविद्यालयाच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती डी. वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डी. ए.के गुप्ता यांनी दिली. 

 

  'नॅक' मूल्यांकन समितीने अभ्यासक्रम पद्धत, मूल्यांकन पद्धत, संशोधनात्मक काम ,पायाभूत सुविधा, प्राध्यापकांची संख्या, विविध विषयांचे निकाल, कॅम्पस प्लेसमेंट सुविधा आदींची माहिती घेतली. समितीने मूल्यांकन करून अखेर पाच वर्षासाठी मानांकन जाहीर केल्याचे कॅम्पस संचालक डॉ. अभिजीत माने यांनी सांगितले

 

 महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश माने म्हणाले 2014 मध्ये स्थापन झालेल्या या महाविद्यालयाने पहिल्याच प्रयत्नात मानांकन मिळवले आहे .या मानांकनामुळे संस्थेच्या शिक्षणाची गुणवत्ता, संशोधन कार्य, पायाभूत सुविधा व विद्यार्थी विकासाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. या यशामध्ये प्राध्यापकवर्ग, कर्मचारी व आजी माजी विद्यार्थी, पालक यांचा मोठा वाटा आहे.

 

 संस्थचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त तेजस पाटील यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes