Awaj India
Register
Breaking : bolt
*चांगल्या जीवनशैलीतून सामाजिक शांतता, राष्ट्रउभारणी शक्य – डॉ. बी. आर. कोरेभारतीय कर्मचारी संघ व भारतीय स्वाभिमानी संघाचे दुसरे महाराष्ट्र राज्य संमेलन २१ नोव्हेंबरलाडी. वाय. पाटील पॉलिटेक्निकचे यश कौतुकास्पद : ऋतुराज पाटीलमुलगा किंवा राजकीय व्यक्तींची स्वीकृत संचालक म्हणून नियुक्ती होणार नाही _ मुश्रीफ यांची स्पष्टोक्तीगोकुळ’ मध्‍ये वसुबारस निमित्‍त म्हैस व गाय-वासराचे पूजनअध्यक्षपदासाठी सतेज पाटील यांनी दोन संचालक द्यावेत; महायुतीची मागणीकोल्हापूरच्या विकासासाठी महापालिकेला भरघोस निधी उपलब्ध होईल-गडहिंग्लज तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत तातडीने समावेश करा*गोकुळच्या अध्यक्ष निवडीत लोकशाहीचा गळा घोटू नका; आमदार सतेज पाटील यांचे आवाहनगोकुळमध्ये प्रशासक नियुक्तीच्या हालचालींना विरोध

जाहिरात

 

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात* *आयईआयचा स्टुडन्ट चाप्टर सुरू*

schedule15 Dec 24 person by visibility 628 categoryशैक्षणिक

*डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात*
*आयईआयचा स्टुडन्ट चाप्टर सुरू*
 
 डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथील कृषी अभियांत्रिकी विभागामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स इंडियाच्या (आयईआय) स्टुडन्ट चाप्टरचे उद्घाटन करण्यात आले. स्टुडन्ट ऑफ इंजिनिअर्स कोल्हापूर लोकल चाप्टरच्या माध्यमातून हा विभाग कार्यरत झाला आहे. भविष्यातील करिअर व रोजगार संधी संशोधन व अध्यापनातील मागणी वेगवेगळ्या विषयावरील प्रशिक्षणे, चर्चासत्रे इत्यादी करिता विद्यार्थ्यांना या स्टुडन्ट चाप्टरचा उपयोग होणार आहे.
 
विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला व चिकित्सक वृत्तीला चालना देण्याकरता कृषी अभियांत्रिकी विभागामध्ये स्टुडन्ट चाप्टर सुरू करण्यात आला. 'कृषी अभियांत्रिकी मध्ये नवनवीन संधी' विषयी अभियंता अजय देशपांडे यांनी तर 'विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजे समाजाचा विकास' याविषयी कुलसचिव प्रा. डॉ.जयेंद्र खोत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
 
 'प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक उत्तम संशोधक दडलेला असतो तो विकसित करणे; ही काळाची गरज आहे' असे कुलगुरू प्रा. डॉ. के. प्रथापन यांनी याप्रसंगी नमूद केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री वसंत पंढरकर (प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, कोल्हापूर) यांनी शहर व रस्ते नियोजन तसेच रस्त्याकडील झाडांची लागवड इत्यादी मधील भविष्यातील रोजगार संधी विद्यार्थ्यांसमोर सादर केल्या.
 
 यावेळी अधिष्ठाता डॉ. संग्राम पाटील, डॉ. मुरली भूपती, आयईआय कोल्हापूर लोकलचे सचिव अभियंता योगेश चिमटे आणि कृषी अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक, प्राध्यापकतेर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या नियोजनाकरिता डॉ.अमोल घाडगे व डॉ.संकेत सावंत यांनी मेहनत केली. कु. साक्षी मोरे व साहिल नदाफ यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. मंगल पाटील यांनी आभार मानले.
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes