कोल्हापूर ;
कोल्हापूर शहरांतर्गत टोल लावून व टोल वसूल करणारे माजी पालकमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील हे महाराष्ट्रात मात्र नेतृत्व दाखवत राष्ट्रीय महामार्गावरील लावलेले टोल मुक्त करा अशा स्वरूपाचा कांगावा करणाऱ्या आंदोलनाचे तीन ऑगस्ट पासून नेतृत्व करणार आहेत. कोल्हापुरात थेट पाईपलाईन योजनेचा देखील त्यांनी कशा पद्धतीने श्रेयवादातून बोजवारा वाजवला आहे याचा नुकताच अनुभव कोल्हापुरातील जनतेने काही दिवसांपूर्वीच पूरस्थितीमुळे अनुभवला आहे. अशी टिका
कोल्हापुरात १२५ कोटींच्या रस्त्याचा खर्च ४५० कोटी पर्यंत नेऊन त्याची वसुली कोल्हापुरातील सर्वसामान्य नागरिकांच्या माथी मारण्याचे पाप पालकमंत्री असताना बंटी पाटील यांनी केले होते. पण भाजप व शिवसेना सरकारने ते पैसे भरले हे कोल्हापुरातील जनता विसरली नाही. तसेच थेट पाईपलाईन योजनेत देखील कशाप्रकारे भ्रष्टाचार केला आहे व प्रकल्पाची रक्कम दुपटीने वाढवली आहे हे सर्व जनतेला माहित आहेच.
आमदार, खासदार, मंत्री यांना टोलची माफी असताना व संपूर्ण कोल्हापूरचा विरोध असताना देखील स्वतः टोलची पावती फाडून कोल्हापूरकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे पाप या तत्कालीन पालकमंत्र्यांनी केले होते. गेली १५ वर्षे कोल्हापूर महानगरपालिकेत सत्ता व गेली ५ वर्षे कोल्हापूर शहरात दोन्ही आमदार असूनदेखील कोल्हापुरकरांना शहरातील रस्त्यावरून फिरताना चंद्रावर फिरण्यासारखा अनुभव सतेज पाटील देत आहेत आणि या प्रश्नावर बोलायचे सोडून ते राष्ट्रीय व राज्याच्या प्रश्नावर आंदोलन करत आहेत.
ज्या रस्त्यांची कामे सुरू आहेत, अथवा ज्या रस्त्यांची कामे झालेली नाही अशा रस्त्यांवरील टोल माफ करण्याचे केंद्र शासनाकडून धोरण निश्चित केले जात असून काही दिवसातच त्याची अंमलबजावणी होणार असून त्यामध्ये पुणे कोल्हापूर रस्ता देखील धरणार असल्याची खात्रीलायक माहिती असले कारणानेच केवळ श्रेय मिळवण्याच्या हेतूने काँग्रेस पक्ष व त्यांचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील हे टोलमुक्त आंदोलनाच्या नावाखाली आंदोलन करून, केंद्रशासनच मुभा देणार असणाऱ्या योजनेचे श्रेय घेऊन जनतेची धूळफेक करत आहेत. तरी असल्या खालच्या थराचे व श्रेय वादाचे राजकारण हे त्यांचे त्यांनाच लखलाभ व जनता असल्या फसवेगिरीला भुलणार नाही याची माजी पालकमंत्र्यांनी नोंद घ्यावी असेही कदम यांनी म्हटले आहे.