Awaj India
Register
Breaking : bolt
खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचा १०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण* :वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कडून विविध विषयांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा*वनस्पतीच्या वाढीसाठी मुळांचे आरोग्य महत्वाचे – प्रा. डॉ. के. प्रथापन* चुये येथे बेंदूर सण उत्साहात साजरावह्याची मदत गोरगरीब विद्यार्थ्यांच्यासाठी, आभाळा इतकी; डॉ. राजन गवसव्हनाळी उपसरपंचपदी संजयबाबा घाटगे गटाच्या अश्विनी जांभळे यांची निवडट्रिपलसीट व एकेरी मार्ग उल्लंघनावर दोन लाख रुपयांचा दंड वसूल भारत गौरव पर्यटन ट्रेन’चे कोल्हापूरात आगमन*सतेज पाटील यांच्या वाढदिवसाचे दातृत्व; गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचे कर्तुत्व वाडीपीर येथील जलजीवन मिशन; कोणी खाल्ले जास्त कमिशन

जाहिरात

 

मधाच्या गावासाठी पाच कोटी 97 लाखाचा रुपयांचा निधी

schedule08 Jun 25 person by visibility 108 category

कोल्हापूर, : 'मधपालनाची चळवळ जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना याचा लाभ व्हावा, हा सरकारचा उद्देश आहे. त्यानुसार पहिले मधाचे केंद्र पुण्यात सुरू करण्यात आले आहे. लवकरच प्रत्येक जिल्ह्यात ही केंद्रे सुरू करण्यात येतील', अशी माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
 
तसेच 'मधाचे गाव' योजनेसाठी पहिल्या टप्प्यात राज्यातील दहा गावांची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी पाच कोटी ९७ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर दुसऱ्या टप्प्यात दाजीपूर गावाचा समावेश करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.
 
साठे म्हणाले, 'शहरातील मधाची पोळं नष्ट होऊ नयेत, यादृष्टीने प्रयत्न होत आहेत. लोकांना शुद्ध मध मिळणे, हा खादी व ग्रामोद्योग मंडळाचा उद्देश आहे. फक्त विक्री डोळ्यासमोर न ठेवता मधाविषयी जागृती करणे यासाठी प्रयत्न होत आहेत.
 
ते पुढे म्हणाले, 'आगामी काळात राज्यात 'हनी कॅफे' सुरू करण्यात येणार आहेत. मंडळाच्या कार्यालयांमधून इथून पुढे चहाऐवजी मधाचा सरबत दिला जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मधाचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाटगावला आता पर्यटकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे येथील अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. त्याचबरोबर पर्यटन विभागाच्या रिसॉर्टमध्ये मध विक्रीला ठेवता येईल काय? या दृष्टीनेही प्रयत्न सुरू आहेत.'
 
खादी महामंडळाने मधमाशीचे जतन, संवर्धन व्हावे, मधमाशी पालनास गती मिळावी, मधाचे उत्पादन अधिक व्हावे म्हणून २०२२ पासून मधाचे गाव ही संकल्पना विकसित केली आहे कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील पाटगांव आणि मानघर अशी मधाची गावे झाली आहेत. आता लवकरच प्रत्येक जिल्ह्यातील एका गांव हे मधाचे गाव करण्यात येणार, अशी माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ज्ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष रविंद्र साठे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली
 
साठे म्हणाले मधासाठी राज्यात पोषक वातावरण आहे राजस्थान, बिहारमध्ये मध निर्यात केला जातो. 
 पुणे येथे मघ विक्री केंद्र सुरू केले असून याच धर्तीवर प्रत्येक जिल्हयात मध विक्री केंद्र सुरु करण्याचा मानस आहे
 
'मधाचे गाव योजनेसाठी पहिल्या टप्यात राज्यातील दहा गावांची निवड करण्यात आली आहे. राज्यात मधाच्या गावासाठी एकूण १७ कोटींचा निधी मजूर असून पहिल्या टप्प्यात १० गावांसाठी पाच कोटी ९७ लाखांचा नियी मंजूर करण्यात जाता. आहे. प्रत्येक गावासाठी सरासरी ५४ लाख
मिळणार आहेत. तर दुसऱ्या टप्पात दाजीपूर गावाचा समावेश करण्यात आत्ता आहे. शहरातील मधाची पोळ नष्ट होऊ नयेत, यादृष्टीने प्रयत्न होत आहेत. लोकांना शुध्द मध मिळणे, हा खादी व ग्रामोद्योग महळाचा उद्देश आहे. केवळ विक्री डोळ्यासमोर न ठेवता मंधाविषयी जागृती करणे यासाठी प्रयत्न होत आहेत पाचगणी लोणवळा येथे हनी कॅफे सुरू केला आहे. आगामी काळात राज्याभर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.
 
मडळाच्या कार्यालयांमधून येथून पुढे चहाऐवजी मधाचा सरबत दिला जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मधाचे गाव म्हणून प्रसिध्द असलेल्या पाटगावला आता पर्यटकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे येथील अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. त्याचबरोबर पर्यटन विभागाच्या रिसॉर्टमध्ये मध विक्रीला ठेवण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरु आहेत. मंडळाकडून मधाबरोबरच खादीचा ही प्रसार केला जाणार आहे. आठवड्यात एक दिवस खादीची कपडे घालण्याचा केंद्र शासनाचा निर्णय असून आपल्या कार्यालयापासून याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचेही साठे यांनी सांगितले,
 
मधसंचालनालय (महाबळेश्वर) चे संचालक रघुनाथ नारायणकर म्हणाले, राज्यात २०२४-२५ या वर्षभरात तीन लाख किलोचे मथ उत्पादन झाले आहे, मधनिर्मिती योजनेचा १८ जून २०२० रोजी शासन निर्णय झाला. त्यानुसार मथमाशांसाठी उपयुक्त ठिकाणांची निवड करुन तेथील मधपालक व केंद्र चालकांना प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये मथपालकाला १० पेट्धा व केंद्र चालकाला २० पेट्या ५० टक्के अनुदानावर दिल्या जातात. यावेळी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्रीकांत जौंजाळ उपस्थित होते.
 
 
 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes