इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्यांना अण्णा ब्रिगेड स्टाईलने उत्तर देऊ*
schedule26 Feb 25 person by visibility 385 categoryराजकीय

वारणानगर:
ज्येष्ठ इतिहास संशोधक मा. इंद्रजीत सावंत यांना देण्यात आलेल्या धमकीचा व छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी काढलेल्या अनुउदगाराबद्दल प्रशांत कोरटकर याचा अण्णा ब्रिगेडच्या वतीने वारणानगर येथे झालेल्या निषेध सभेत जाहीर निषेध करण्यात आला.
मा.इंद्रजीत सावंत हे इतिहास संशोधनाचे काम करणारे आघाडीचे महाराष्ट्रातील संशोधक आहेत.त्यांनी बहुजनांचा इतिहास उजेडात आणण्याचे महत्त्वपूर्ण काम केलेले आहे.त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी, अण्णा ब्रिगेड स्टाईलने प्रशांत कोरटकर याला धडा शिकवला जाईल,असा सज्जड इशारा यावेळी देण्यात आला.
सदर निषेध सभेस संस्थापक अध्यक्ष डॉ.अमोल महापुरे, कार्याध्यक्ष आनंदराव फाळके, जिल्हा नेते निलेश महापुरे, हातकणगले तालुका अध्यक्ष रोहित सुवासे,पन्हाळा तालुका अध्यक्ष नितीन वायदंडे, पन्हाळा शाहूवाडी वि.अध्यक्ष सचिन पोवार, वाळवा तालुका कार्याध्यक्ष गणेश पवार, शालमोन लोखंडे, आकाश कांबळे, विजय पाटोळे, विश्वजीत भोसले यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.