Awaj India
Register
Breaking : bolt
आर्किटेक्चर नंतर करिअरच्या* *अमर्याद संधी - डॉ. ए. के. गुप्ता*नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कधी भरपाई देणार**डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये* *शनिवारी ‘डायबेटिक फूट’वर परिषद*अतिसार थांबवा अभियान’ प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी अमोल येडगे*खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचा १०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण* :वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कडून विविध विषयांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा*वनस्पतीच्या वाढीसाठी मुळांचे आरोग्य महत्वाचे – प्रा. डॉ. के. प्रथापन* चुये येथे बेंदूर सण उत्साहात साजरावह्याची मदत गोरगरीब विद्यार्थ्यांच्यासाठी, आभाळा इतकी; डॉ. राजन गवसव्हनाळी उपसरपंचपदी संजयबाबा घाटगे गटाच्या अश्विनी जांभळे यांची निवड

जाहिरात

 

कलायोगी जी. कांबळे यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कार द्या

schedule28 Jul 20 person by visibility 1202 categoryसामाजिक

 खाटिक समाजाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
आवाज इंडिया न्यूज
कोल्हापूर :
आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्रकार कलायोगी जी. कांबळे यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कार देऊन त्यांच्या कलेचा उचित सन्मान करावा अशी मागणी खाटिक समाजाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या संदर्भातील निवेदन मेलद्वारे मुख्यमंत्र्यांसह जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांना पाठविले आहे.
सिनेमा पोस्टरच्या दुनियेतला सम्राट, कला पंढरीचा वारकरी, कोल्हापूर भूषण आणि पोस्टरचा बादशहा कलायोगी जी कांबळे चा जन्म२२जुलै१९१८मध्ये अत्यंत गरीब खाटीक कुटुंबात कोल्हापूर च्या मंगळवार पेठेत जन्म झाला, जेमतेम तिसरी पर्यंत शिक्षण घेतलेल्या कांबळे ना चित्रकलेची आवड मात्र बालपणापासून जोपासली. चित्रकलेच्या आवडीला त्यांनी बारीक निरीक्षण, स्वविचार आणि निर्माणशील मनाने प्रचंड मेहनत घेऊन तेही चित्रकलेचे कोणतेही प्राथमिक शिक्षण नसताना व कोणत्याही मान्यवर चित्रकाराचे मार्गदर्शन नसताना आपल्या अंगभूत गुणांवर व ईश्वरी सामर्थ्यावर विश्वास ठेऊन त्यांनी कलाक्षेत्रात स्वतः चे स्थान निर्माण केले त्यातूनच पोस्टर पेटिंगचा बादशहा म्हणून त्यांनी भारतभर सन्मान मिळवला.
दिल्लीत १९६०साली "मोगले आझम"चित्रपटाची जी कांबळे यांनी रेखाटलेली भव्य पोस्टर पेटिंग पाहून एलिझाबेथ राणीने आपल्या स्वागताची मिरवणूक काही वेळ थांबवली होती त्या इतक्या पोस्टर पेंटिंग वर प्रभावित झाल्या होत्या .भारतीय सिनेमा पोस्टरमध्ये जी कलात्मकता व भव्यता आली तिचा पाया यांनीच घालून दिला पोस्टर पेंटिंगला अभिजात कले सारखा दर्जा प्रतिष्ठा आणि जागतिक किर्ती मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे,त्यांनी पोट्रेट पेंटींगच्या क्षेत्रातही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.
तरी या कलयोगीचा उचित सन्मान होण्यासाठी त्यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, असे या निवेदनात म्हंटले आहे. हे निवेदन खाटिक समाज कोल्हापूरचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव, सचिव संजय भोपळे, अखिल भारतीय खाटीक समाज कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री.विजय कांबळे यांनी ई-मेल द्वारे पाठविले आहे.
छत्रपती शिवरायांचे साकारले चित्र
कलायोगी यांनी सतत पाच वर्षे अभ्यासपूर्वक बनविलेल्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या अस्सल तैलचित्राला शासनाची अधिकृत चित्र म्हणून राज मान्यता मिळाली आहे. या छत्रपतीच्या चित्राची तत्कालीन शासनाने रॉयल्टी देऊ केली होती पण त्यांनी देवाचे चित्र काढण्यासाठी पैसे घ्यावयाचे नसतात म्हणून त्यांनी ती स्वीकारली नाही

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes