कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग 20 मध्ये किशोरी कोळेकर चर्चेत
schedule28 Nov 25 person by visibility category
भावी नगरसेविका म्हणून जनतेत वाढतंय आकर्षण
कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 20 मध्ये किशोरी गणेश कोळेकर यांची सामाजिक कार्याची जोरदार चर्चा सुरू असून, भावी नगरसेविका म्हणून त्यांच्याकडे जनतेचा कल वाढताना दिसत आहे. विविध सामाजिक उपक्रम, लोकसहभाग आणि प्रभागातील समस्यांवर केलेला वेध यामुळे त्यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोनाच्या कठीण काळात त्यांनी अत्यावश्यक साहित्य, अन्नधान्य, औषधे तसेच गरजूंना तातडीने मदत करून नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण केला. पावसाळ्यात पूरग्रस्तांना मदत, गरीब व अपंग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, छत्री वाटप, महाप्रसाद वाटप अशा उपक्रमांमुळे त्यांची ओळख सामाजिक कार्यकर्त्या म्हणून घट्ट झाली आहे.
प्रभागातील सांस्कृतिक कार्यक्रम, महिला सक्षमीकरण उपक्रम, युवकांना प्रोत्साहन आणि विविध विकासकामांसाठी केलेला पाठपुरावा यामुळे त्यांना सर्वत्र दाद मिळत आहे. प्रभागातील लोकांच्या मतांनुसार “जनतेची खरी सेवा करणारी, उपलब्ध राहणारी आणि समस्यांवर तोडगा काढणारी नगरसेविका अशी व्यक्तीच महानगरपालिकेत जावी” असा निर्धार नागरिकांनी व्यक्त केलेला आहे.
त्यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक 20 मध्ये निवडणुकीचं वातावरण उत्साहात रंगताना दिसत असून, सर्वसामान्यांमध्ये नवीन आशा निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.