Awaj India
Register
Breaking : bolt
लोककलांतून उलगडला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपटजुन्याप्रमाणे संच मान्यता चालू ठेवली नाही तर ; गुलाम शिक्षण पद्धतीतून निर्माण होतीलवसा पारंपारिक लोक संस्कृतीचा'" या कार्यक्रमाचे आयोजनसाळोखेनगर डी. वाय.पी.मध्ये रक्तदान शिबिर संपन्नराज्य राखीव पोलीस वर्धापन दिनानिमित्त संचलन परेड सोहळा उत्साहात*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या राज निकमची* *बल्गेरिया येथे रिसर्च इंटर्नशिपसाठी निवड*महिलांनी अन्यायाविरुद्ध लढावे अन्याय करू नये; अनुराधा भोसलेकल्पना मंथन देसाई यांना आदर्श महिला पुरस्कारजयश्री अशोक कुरबेट्टी यांना आदर्श महिला पुरस्कारमनाली सुनील मंडालकर यांना आदर्श महिला पुरस्कार

जाहिरात

 

महिलांनी अन्यायाविरुद्ध लढावे अन्याय करू नये; अनुराधा भोसले

schedule11 Mar 25 person by visibility 326 categoryसामाजिक

कोल्हापूर;
महिलांच्या वर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाच्या विरोधात महिलांनी लढावे. अन्याय करणाऱ्या वर कठोर शिक्षा व्हावी यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करावेत; मात्र आपण कुणावर अन्याय करणार नाही याची दक्षता ही घ्यावी, असे परखड मत अवनीच्या अनुराधा भोसले यांनी व्यक्त केले.
त्या राजर्षी शाहू स्मारक भवन येथे कृती फाउंडेशन यांच्या वतीने महिला सुसंवाद मेळाव्यामध्ये बोलत होत्या. अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार नम्रता चौगुले होत्या. यावेळी प्रसिद्ध वक्ते रवींद्र खैरे यांचे आनंदी जीवनासाठी या विषयाचे व्याख्यान आले. या सुसंवाद मेळाव्यात प्रसिद्ध वक्ते प्रमोद हर्षवर्धन, विजय दीक्षित, प्राध्यापक अनुराधा पाटील यांनी सहभाग घेतला.
अवनीच्या भोसले म्हणाल्या, बाळाला टाकून जाणाऱ्या महिला मी बघितल्या. नवऱ्याने कितीही अन्याय केला तरी त्याला मारू नका म्हणणाऱ्या महिला बघितल्या. त्यामुळे अन्याय सहन केला नसला पाहिजे व इतरांच्या वर अन्याय झाला नसला पाहिजे याची खबरदारी महिलांनी घ्यावी. आपण कुठेही कमी नाही याची महिलांनी जाणीव ठेवत प्रत्येक क्षेत्रात पुढाकार घ्यावा. पुढाकार घेत असताना कोण काय म्हणते याची कधीही पर्वा करू नये आपल्या कामाकडे लक्ष द्यावे.
यावेळी रवींद्र खैरे म्हणाले, आनंदी जीवनासाठी आपल्याजवळ जे आहे त्यात समाधान म्हणून आनंद व्यक्त केला पाहिजे. कोणाला तरी जळण्यासाठी आनंद व्यक्त करू नये, दुसऱ्याचा द्वेष करू नये स्वतःवर प्रेम केलं पाहिजे तरच जग सुंदर दिसेल.
प्रमोद हर्षवर्धन यांनी स्टेटसच्या दुनियेत जगायचं असेल तर आपला व्यक्तिमत्त्वाचा स्टेटस वाढवला पाहिजे. त्यासाठी कुठे गेलो काय खाल्लं त्याच्या स्टेटस पेक्षा आपण इतरांच्या पेक्षा काय वेगळे आहोत आपले व्यक्तिमत्व काय आहे. हा स्टेटस जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
यावेळी एडवोकेट वर्षा पाटील, दीप्ती दिलीप कांबळे, डॉक्टर सुचिता भोसले, सारिका पाटील, सुलोचना नार्वेकर, आरती कांबळे, पूनम गिरीश मट्टिकल्ली, भारती सुरेश माने, माधुरी मेस्त्री, पूजा शिंदे, आरती मंडलिक, सीमा शेवाळे, डॉक्टर शिल्पा कुंभार, वर्षा कांबळे, जानकी मोकाशी,डॉक्टर प्रवीणा कुलकर्णी, अश्विनी कोरवी, धनश्री पाटील, पूजा घाटगे, माधुरी पोळ, मनीषा पाटील, रूपा वायदंडे, अर्चना पाटील, पुनम पोवार, डॉ. प्रांजली सुखदेव व्हटकर-जाधव,मनाली सुनील मंडालकर,जयश्री अशोक कुरबेट्टी, कल्पना देसाई यांचा आदर्श महिला म्हणून सन्मान चिन्ह मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
तेजस्विनी पंचाळ यांनी सूत्रसंचालन केली. प्रशांत चुयेकर यांनी प्रस्तावित केले. प्रशांत धनवडे यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम केले. यावेळी 100 पेक्षा अधिक महिलांनी उपस्थिती दाखवत सुसंवाद मेळाव्यात सहभाग नोंदविला.
 
 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes