Awaj India
Register
Breaking : bolt
रोटरी सेंट्रलचे मिस चायवाली शिवानीच्या स्वप्नांना पाठबळ*डी. वाय. पाटील फिजिओथेरपीला सर्वसाधारण विजेतेपद*लोकशाहीच्या पुन:र्स्थापनेसाठी सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय :आमदार सतेज पाटील आनदराव पाटील चुयेकर ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल ९७%नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्केडी. वाय. पाटील ज्यु. कॉलेजचा* *बारावीचा निकाल ९९.१७ टक्के*मित्र-मैत्रिण नाते किती ग्रेट?निवडणुकीनंतर लाडकी बहीण राज्य सरकारला सावत्र झाली; आमदार सतेज पाटील यांची टिका...शाश्वत दुग्ध व्यवसायासाठी नवनिर्मित तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज ; अरुण डोंगळेशालेय आयडी घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करा : प्रवीणभाई माणगावे

जाहिरात

 

जयश्री अशोक कुरबेट्टी यांना आदर्श महिला पुरस्कार

schedule08 Mar 25 person by visibility 445 categoryसामाजिक

कोल्हापूर
निपाणी येथील जयश्री अशोक कुरबेट्टी यांना आदर्श महिला पुरस्कार जाहीर करण्यात आला. कृती फाउंडेशन यांच्यावतीने 8 मार्च रोजी शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे पुरस्काराचे वितरण समारंभ होत आहे.
दहावीचे शिक्षण झाल्यापासून त्यांनी लहान मुलांना क्लास देण्याचे सुरुवात केली. सुरुवातीला मोफत क्लास घेत समाजसेवा करण्याचं काम केलं. मिळालेल्या फी मधून  घरखर्च केला.  बालवाडी शिक्षिका प्रशिक्षण घेतले. एका बालवाडीत (खाजगी) 400. पगारावर नोकरी किली. मुलांना बालसंस्काराचे घड़े देण्यास सुरु.  शिक्षणाची प्रबळ इच्छा असल्याने  डी. एड. शिक्षक प्रशिक्षण त्यांनी जोडीदाराच्या साथीने पूर्ण केले.  विनाअनुदानित/खाजगी शाळेतून कार्यरत गेली 15 वर्षे वेगवेगळ्या शाळांमध्ये सवा बजावली आहे. सध्या सुद्धा प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. शाळेतील व इतर मुलींना देखील वेगवे‌गळ्या स्पधमिध्ये डान्स चित्रकला, प्रतिभा करंजी स्पर्धा, सहभागी होण्यासाठी नेहमीच प्रोत्साहीत केले.  शाळेतील गरीब गरजू विदयार्थ्यांना पेन, पेन्सिल, रबर, शापनर अशा शालेय उपयोगी वस्तू वाटप केल्या.
याचबरोबर भारत स्काऊट गाईड या संस्थेची निपाणी शाखेमध्ये  गर्ल गाईडची कॅप्टन म्हणून गेली 3 वर्षे त्या कार्यरत आहे. स्वच्छता अभियान, राष्ट्रीय सणादिवशी विविध कार्यक्रमात मुलींना घेऊन सहभागी. गायन स्पर्धात्मक मुलीकडून सराव करून घेण्याचे कार्य केले. अनेका विविध ठिकाणी रॅलीमध्ये गर्ल गाईईच्या - वतीने सहभागी असतो. पोलीसांचे वाहन रहदारीचे
वतीने सहभाग. पोलीसांचे वाहन रहदारीचे नियमांचे पालन आपल्या घस्च्या लोकांपासून सुरुवात करून समाजातील इतर सर्व लोकांना महत्व पटवून सप्ताह साजरा करण्यात आला.  महिला मंडळाच्या वतीने वृक्षारोपण, वृद्धाश्रमातअनाथाश्रमात वाढ‌दिवस साजरा करून त्या निरागस लोकांना आनंद देण्याचा उपक्रम राबविले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.


जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes