अरविंद कांबळे सर—शिक्षणपेशीला शोभेल असं बहुआयामी व्यक्तिमत्व
schedule27 Nov 25 person by visibility 22 categoryशैक्षणिक
कोल्हापूर
श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्यामंदिरातील शिक्षक अरविंद शंकर कांबळे (निवास – पंचशील नगर, गोकुळ-शिरगाव) यांनी आपल्या बहुआयामी कार्याने शिक्षण क्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे. १ ऑक्टोबर १९९७ रोजी रुजू झाल्यापासून अध्यापन, सांस्कृतिक कार्यक्रम, स्काउट मार्गदर्शन, लेखन व सामाजिक कार्य या सर्वच क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.
एम.ए.(मराठी), बी.एड., LL.B (III APP) अशी शैक्षणिक पात्रता लाभलेल्या कांबळे सरांचे विद्यार्थी घडवण्यातील कौशल्य विशेष उल्लेखनीय. स्काउटच्या Basic–Advance व हिमालय Wood Badge प्रशिक्षणे, CCRT हैदराबाद प्रशिक्षण, तसेच तालुका–जिल्हास्तरावर अनेक वेळा R.P. म्हणून मार्गदर्शन ही त्यांची ठळक कामगिरी आहे.
सांस्कृतिक क्षेत्रात ते ५० पेक्षा अधिक स्पर्धांचे परीक्षक राहिले आहेत. शाळेत सांस्कृतिक प्रमुख म्हणून त्यांचे काम आदर्शवत मानले जाते. ऑनलाईन कामकाज, कार्यालयीन कार्य आणि शिष्यवृत्ती मार्गदर्शनातही त्यांचा मोलाचा वाटा आहे.
२००१ च्या जनगणनेत “उत्कृष्ट प्रगणक” म्हणून सिल्वर मेडल, शेकोटी स्पर्धेत दोनदा प्रथम क्रमांक, तसेच २०१८ व २०२० मधील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, आणि २०२३ मधील अश्वघोष फाउंडेशनचा सन्मान हे त्यांच्या कार्याचे राजमुद्रा आहेत.
‘सकाळ’मध्ये २०१९ मध्ये तब्बल २१५ लेख प्रकाशित होणे ही त्यांच्या लेखनकौशल्याची दखल घेण्याजोगी बाब.
सामाजिक क्षेत्रातही त्यांनी रेड क्रॉस सोसायटीचे जिल्हा सचिवपद, आरोग्य शिबिरे व पुरग्रस्त मदत कार्य अशी जबाबदारी समर्थपणे पार पाडली आहे.
विद्यार्थीप्रिय, अभ्यासू, कलावंत आणि समाजाभिमुख अशा अरविंद कांबळे सरांचे व्यक्तिमत्व शिक्षणपेशीला शोभेल असेच आहे—खऱ्या अर्थाने ‘आदर्श शिक्षक