Awaj India
Register
Breaking : bolt
कुर्डूवाडी-माढा परिसरात शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!*सीएचबी प्राध्यापकांच्या प्रश्नांसाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार: शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे*मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री मुश्रीफ यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही तुमचा आमच्यावर विश्वास नाही का?आम्ही शपथ घेणारच नाही”*पहिल्या फेरीतच कौस्तुभ गावडे यांना विजयी करणार; शिक्षक नेते दादासो लाड यांची स्पष्टोक्ती*शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करणारच: शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांची स्पष्ट भूमिका*सखोल वैद्यकीय ज्ञान घेऊन* *आदर्श डॉक्टर बना- डॉ. संजय डी. पाटील*कराडमध्ये पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ; कौस्तुभ गावडे यांना वाढता पाठिंबा*करवीर तालुक्यातील ठरावधारकांचा छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीला भक्कम पाठिंबा*महायुतीच्या ऐतिहासिक विजयात राधानगरी- भुदरगडचा सिंहाचा वाटा असेल*

जाहिरात

 

मनिषा राजेंद्र पाटील यांना यावर्षीचा 'आदर्श महिला पुरस्कार'

schedule06 Mar 25 person by visibility 943 categoryशैक्षणिक

कोल्हापूर
कसबा सांगाव (ता. कागल) येथील येथील मनिषा राजेंद्र पाटील यांना कृती फाउंडेशन यांच्यावतीने यावर्षीचा 'आदर्श महिला पुरस्कार' जाहीर करण्यात आला. ८ मार्च रोजी शाहू स्मारक भवन येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण समारंभ पार पडणार आहे.
 
पाटील यांना लहानपणापासून वक्तृत्व स्पर्धेची आवड आहे. शालेय जीवन ते महाविद्यालयात त्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेले आहेत.
वक्तृत्व, वादविवाद, कथाकथन स्पर्धेत त्यांनी राज्यस्तरीय बक्षीस मिळालेले आहेत.
 
शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्पामध्ये प्रबोधनाचा जागर,आरोग्य विभाग यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या लेक वाचवा देश वाचवा, अभियानांतर्गत महिलांना मार्गदर्शन, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच आरोग्य सेविका, आशा वर्कर्स यांना मार्गदर्शन,महिला बचत गट सक्षमीकरणाकरता विशेष काम,विविध दैनिक, साप्ताहिक, मासिंकांमधून विविध विषयांवर लिखाण, वृक्षारोपन, महिला सक्षमीकरण, अंधश्रद्धा निर्मूलन आदी सामाजीक कार्यात सक्रीय सहभाग, विविध शाळां मध्ये विद्यार्थी व पालकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आलेला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes