+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustमार्केट सेसच्या सुधारित जी आर चे व्यापाऱ्यांच्याकडून साखर पेढे वाटून स्वागत adjustपालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून बांधकाम कामगारावर अन्याय adjustकेंद्रीय रेल्वे व जलशक्ती राज्यमंत्री श्री. व्ही. सोमन्ना यांचा जिल्हा दौरा adjustमिशन रोजगार’ अंतर्गत रविवारी* *कॉर्पोरेट स्कील डेव्हलपमेंट प्रोग्राम* adjustकोल्हापुरातील महायुतीच्या तीन विधानसभा मतदार संघात ठिणगी adjustमहायुतीचे कोल्हापुरातील तीन विधानसभा मतदारसंघ धोक्यात adjustविशाल अनिल आवडे यांना पुरस्कार adjustउद्योगजकांशी सरंक्षण क्षेत्रातील संधीबाबत जनरल विनोद खंदारे यांचे मार्गदर्शन adjustविकास कामाच्या 'ऋतू' मध्ये निधीचा 'अमल' न झाल्याची टीका adjustशाहुवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात विनय कोरे यांची डोकेदुखी वाढणार
schedule07 Jan 24 person by visibility 110 categoryराजकीय
*
कोल्हापूर दि.०६ : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे कोल्हापूरवर विशेष प्रेम होते. शिवसेना आणि कोल्हापूर हे समीकरण तयार झाले असून मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिवसेनेची घोडदौड सुरु आहे. शिवसेनाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली पार पडणाऱ्या शिवसेनेच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये खंड पडला होता. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाची प्रथा मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांनी पुन्हा सुरु केली असून, शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन कोल्हापुरात होणार आहे. दि.२७ जानेवारी रोजी शिवसंवाद मेळाव्या अंतर्गत मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचा पदाधिकारी मेळावा होणार असून, दि.२८ जानेवारी रोजी शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन कोल्हापुरात पार पडणार आहे. याकरिता देशभरातून शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी कोल्हापुरात येणार आहे. त्यामुळे जानेवारीच्या अखेरीस शिवसेनेचा भगवा झंझावात कोल्हापुरात येणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शिवसंवाद दौऱ्याच्या अनुषंगाने कोल्हापुरात शिवसेना पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक राजर्षि शाहू स्मारक भवन दसरा चौक येथे पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते.  
 मेळाव्याच्या सुरवातीस बोलताना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी, मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांचे गेल्या काही महिन्यात कोल्हापुरात पाठोपाठ दौरे सुरु असून, त्यांचे कोल्हापूरवर विशेष लक्ष आहे. शिवदूत संकल्पनेतून पक्षाच्या कार्याला नागरिकांच्यापर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. यासाठी तात्काळ शिवदूत नोंदणी पूर्ण करावी. आगामी निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी कामाला लागावे अशा सूचना पदाधिकाऱ्यांना केल्या.
 यानंतर प्रमुख मार्गदर्शन करताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्र संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या राज्यभर १६ पदाधिकारी मेळावे पार पडणार आहेत. याचा उद्देश शिवसेनेचे सर्व खासदार पुन्हा निवडून आणण्याचा आहे. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमाणे मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे साहेब यांचे कोल्हापूरवर विशेष प्रेम आहे. शासन आपल्या दारी उपक्रमानंतर लगेचच पदाधिकाऱ्यांचा मेळावा आपण यशस्वी केला. कोल्हापुरातील शिवसेनेचे सर्वच कार्यक्रम यशस्वी होतात असे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांचे पक्के मत असून त्याच्या शिवसंवाद दौऱ्याची सांगता ही कोल्हापुरातील पदाधिकारी मेळाव्याने होणार आहे. यासह कोल्हापूरातील पदाधिकाऱ्यांसाठी विशेष बाब म्हणजे शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन कोल्हापुरात पार पडणार असून, देशभरातील शिवसेना पदाधिकारी, नेते, लोकप्रतिनिधी यांची कार्यशाळा यामध्ये होणार आहे. शिवसेनेतील क्रांतीनंतर कोल्हापूरचे निष्ठावंत, कट्टर शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी आणि मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पाठीशी राहिले. कोल्हापुरातील प्रत्येक कार्यक्रम यशस्वी केला. याची चर्चा राज्यभर झाली. त्यामुळे आगामी कार्यक्रम महत्वाचा असून शिवसेना पक्षाला नवी दिशा देणारा आहे. कोल्हापुरातील या राष्ट्रीय अधिवेशन आणि शिवसंवाद मेळाव्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली असून, शिवदूत संकल्पनेच्या माध्यमातून घरोघरी पोहचून वरिष्ठांचे आदेश पाळावेत. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे सर्वच उमेदवार विजय करण्यासाठी मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या कार्याला बळकटी द्यावी, असे प्रतिपादन केले.
यावेळी महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव यांनी मनोगते व्यक्त केली. निवेदन जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवसेना समन्वयक वैद्यनाथ वाघमारे यांनी केले. यावेळी श्री उत्तरेश्वर पेठ वाघाची तालीम अध्यक्ष श्री.अशोक राबाडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
या मेळाव्यास माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, दक्षिण शहरप्रमुख महेंद्र घाटगे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, उदय भोसले, तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, प्रा.शिवाजी पाटील, समन्वयक सुनील जाधव, बांधकाम कामगार सेना जिल्हाप्रमुख सुहास साका, महिला आघाडी महानगरप्रमुख मंगलताई साळोखे, उत्तर शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, दक्षिण शहरप्रमुख अमरजा पाटील, युवतीसेना शहरप्रमुख नम्रता भोसले यांच्यासह शिवसेना जिल्हा व शहर पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना व अंगीकृत संघटना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

प्रती,
मा. संपादकसो,
दै._____________
    यांना... सस्नेह जय महाराष्ट्र..!!
तरी वरील बातमी प्रसिद्ध करून सहकार्य करावे. हि विनंती.
कळावे.
आपला,
नंदू सुतार, कार्यालय प्रमुख, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, कोल्हापूर