Awaj India
Register
Breaking : bolt
शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कौस्तुभ गावडे यांना पसंतीक्रमांक १ चे मत देऊन विजयी करा!स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीची ताकद*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनकुर्डूवाडी-माढा परिसरात शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!*सीएचबी प्राध्यापकांच्या प्रश्नांसाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार: शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे*मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री मुश्रीफ यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही तुमचा आमच्यावर विश्वास नाही का?आम्ही शपथ घेणारच नाही”*पहिल्या फेरीतच कौस्तुभ गावडे यांना विजयी करणार; शिक्षक नेते दादासो लाड यांची स्पष्टोक्ती*शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करणारच: शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांची स्पष्ट भूमिका*सखोल वैद्यकीय ज्ञान घेऊन* *आदर्श डॉक्टर बना- डॉ. संजय डी. पाटील*

जाहिरात

 

नॅशनल कुस्ती अकॅडमी नंदगावच्या कुस्तीपटूंची यशस्वी कामगिरी

schedule09 Dec 24 person by visibility 2276 categoryक्रीडा

कोल्हापूर ; सिद्धी साळुंखे
            नंदगाव (ता. करवीर) येथील नॅशनल कुस्ती अकॅडमीने कुस्ती क्षेत्रात मोठे यश संपादन केले आहे. एन.आय.एस. कोच कृष्णान कांबळे व एन.आय.एस कोच तानाजी कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अकॅडमीत प्रशिक्षण घेत असलेल्या कुस्तीपटूंनी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे.
          सतेज दळवी ने 45 किलो वजन गटात साई नॅशनल सुवर्णपदक, अनिकेत पाटील ने 48 किलो वजन गटात राज्यस्तरीय सुवर्णपदक मिळवून नॅशनल सिलेक्षन केले, तर महेश पाटील ने 50 किलो गटात शालेय नॅशनल सिलेक्षन केले. केदार वाडकर 60 किलो वजन गटात शालेय नॅशनल सिलेक्षन मध्ये सहभागी झाला, अतुल मगदूम ने 77 किलो गटात खाशाबा जाधव स्पर्धेत रौप्यपदक जिंकले, विवेक चौगले ने 82 किलो गटात महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कास्यपदक मिळवले, सुयश साठे ने 48 किलो गटात राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक मिळवला आणि प्रणिती साठे ने 45 किलो गटात शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवला.
याशिवाय, राजवीर कुंभार आणि शुभम चौगले यांची निवड नागराज मंजुळे यांच्या आगामी मराठी चित्रपटासाठी खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट मध्ये झाली आहे. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes