प्रा. सचिन ताराचंद धुर्वे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
schedule01 Apr 25 person by visibility 95 categoryशैक्षणिक

कोल्हापूर;
कृती फाउंडेशन कोल्हापूर यांच्यावतीने शिंगणापूर
(ता. करवीर,)येथील प्रा. सचिन ताराचंद धुर्वे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला. रविवारी (दि.6 एप्रिल) शाहू स्मारक भवन कोल्हापूर, येथे साडेचार वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
धुर्वे यांनी अमरावती जिल्ह्यातील आदिवासी जमातींच्या मानवी अधिकाऱ्यांच्या जपूनुकीसाठी आदिवासी विकास महामंडळाच्या भूमिकेचे अध्ययन २००२ते २००७’ या विषयात एम फील केले. महाराष्ट्रात विधान परिषद सदस्याचे निवडीचे राजकारण 2002 ते 2020” या विषयावर संशोधनकार्य सुरू आहे.राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सेमिनार आणि परिषदांमध्ये १५ पेक्षा जास्त संशोधन निबंध वाचन आणि प्रसिद्ध झाले आहेत. २०१९ ते २०२२ या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजनेची प्रार्थना अधिकारी म्हणून विविध सामाजिक कार्यात सहभाग. कोल्हापूर मधील महापूर परिस्थिती व कोरोना काळात शासकीय उपक्रमात धुर्वे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे.