Awaj India
Register

जाहिरात

 

प्रा. प्रमोद झावरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

schedule02 Apr 25 person by visibility 45 categoryशैक्षणिक

कोल्हापूर;
कृती फाउंडेशन कोल्हापूर यांच्यावतीने पेठवडगांव, नवीन वसाहत, (ता. हातकणंगले) येथील प्रा. प्रमोद झावरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला. रविवारी (दि.6 एप्रिल) शाहू स्मारक भवन कोल्हापूर, येथे साडेचार वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
 
झावरे यांचे शिक्षण एम एस सी केमिस्ट्री असे झाले आहे यासह एम.ए. मराठी पी.जी. डिप्लोमा इन जैनॉलॉजी सर्टिफिकेट कोर्स इन आय.टी. झालेले आहे सध्या ते
गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालय येथे कार्यरत आहेत 
ते ३५ वर्षे अध्ययन व अध्यापन कार्यरत आहेत. त्यांनी १० वर्षे शास्त्र शाखा समन्वयक, ०५ वर्षे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र समन्वयक,१० वर्षे सांस्कृतिक विभाग प्रमुख ०५ वर्षे महाविद्यालय नॅक समन्वयक,महाविद्यालय विकास समिती सदस्य, २०२१ पासून शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर या संस्थेच्या कौन्सिल सदस्य पदी कार्यरत आहेत.
यासह प्रा. झावरे हे सद्‌गुरु श्री अनिरुध्द उपासना केंद्र, पेठ वडगांव, कार्यकारिणी सदस्य, गणेश हास्ययोग क्लब, पेठ वडगांव अँकर पर्सन भारतीय जल संस्कृती मंडळ, कोल्हापूर सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
 
Covid-19 काळात त्यांनी जनजागरण गीत - जिंकू आम्ही जिंकू,नका ओलांडू घराचा उंबरा काव्य लेखन केलेले आहे.यासह वडगांव नगपालिकेस १०० मास्क प्रदान,Environment Conservation of India कोल्हापूर, कोल्हापूर यांना धान्य कीट वाटपाकरिता आर्थिक मदत, श्री छत्रपती शिवाजी कोविड सेंटर आर्थिक मदत वडगांव नगरपालिका, पत्रकार बंधू, अॅब्युलन्स करीता आर्थिक मदत, कोरोना काळात थुंकू नका थुकीमुळे रोगराई पसरते यावर अभ्यासपूर्ण समाज प्रबोधनावर व्याख्यान समाजाला उर्जा देणाऱ्या प्रबोधनपर Documentary Films,महिला दिनानिमित्त महिलांचे कार्यकर्तृत्व, संत गाडगेबाबा यांचे सर्वकष विचार आचार डॉ. सी. व्ही. रामन यांचे भारतीय संशोधन क्षेत्रातील योगदान,पर्यावरण जनजागरण मोहीम,भगवान महावीरांचे विचार आणि सद्यस्थिती, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनपट,छत्रपती शाहु महाराज जीवनपट,लोकसभा, विधानसभा निवडणूक मतदान लोकशाहीचा सन्मान,डेंग्यु जनजागरण, पर्यावरणपुरक दिवाळी, चांद्रयान इस्त्रो इतिहास,जागतिक लोकसंख्या दिन, हास्ययोग - एक औषध,स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, जागतिक योग दिन अष्टांग योग साधना महत्व, शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेल्या व्यक्तिमत्वांचे आदर्शवत उर्जात्मक फिल्मस्स,सद्‌गुरु श्री अनिरुध्द उपासना केंद्राद्वारे सेवा, इको-फ्रेंडली गणेशमुर्ती महत्व व प्रत्यक्ष तयार केल्या.,स्वच्छता मोहिम (मंदिर शाळा) सहभाग, जुनं ते सोनं अंतर्गत जुने कपडे खेळणी वाटप
 कोल्हापूर मेडिकल कॅम्प पेंडारवळे - सेवा, डिझास्टर मॅनेजमेंट कोर्स माध्यमातून पूरग्रस्तांना सहकार्य,Nuclear, Biological and Chemical (NBC) war यावर जनजागरण व्याख्याने दिली आहेत
सामाजिक क्षेत्रात झावरे यांनी २६ नोव्हेंबर २०२३ संविधान जनजागरण.. घरी, चौकात, पोलिस स्टेशन येथे संविधांनाची माहिती व महती पटवून सांगितली.११ जुलै जागतिक लोकसंख्या दिन.. फक्त एक मुलगीवर शस्त्रक्रिया केलेल्या दाम्पत्याचा आदर्श दाम्पत्य म्हणून सत्कार केला आहे. विविध विषयावर व्याख्याने सुद्धा दिले आहेत त्यांच्या सामाजिक शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.
 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes