+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustजिल्हा परिषदेमार्फत 'गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा' उपक्रम* adjustहिंदू देव देवितांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा : भाजपाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन adjustहुकुमशाही विषवल्ली तोडून टाकण्यासाठी नारीशक्ती एक व्हा आणि शाहूंना विजयी करा adjustखतीजा शकील मेस्त्री राज्यात पहिली adjustजनतेचे प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी शाहू महाराजांना निवडून द्या adjustनिगवे येथे शाहू छत्रपतींनी साधला संवाद adjustमाजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी दिला शाहू महाराजांना शब्द adjustदेशात भाजपचा हुकूमशाही कारभार ;सौरभ खेडेकर यांची टीका adjustशाहू छत्रपती यांची रंगपंचमी; संभाजी राजे यांची जूनची हमी adjustगोकुळ’ च्या कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन संघाच्या आणि दूध उत्पादकांच्या उत्कर्षासाठी काम करावे
schedule30 Mar 24 person by visibility 102 categoryराजकीय

कोल्हापूर (प्रशांत चुयेकर)
महाविकास आघाडीचेे उमेदवार, शाहू छत्रपती यांनी यावेळची रंगपंचमी माजी सैनिकांच्या बरोबर घालवली.माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी मात्र जून शिवाय रंग लावणार नाही हा निर्णय घेतला.तर संयोगिता राजे छत्रपती यांनी शाहू छत्रपती यांच्या उत्साहात सहभागी होत रंगपंचमीला प्रतिसाद दिला.

रंगपंचमी असल्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांची सकाळ वाड्यावरच होती.महाराज वाड्यावर आहेत म्हटल्यावर कार्यकर्त्यांची सुद्धा रीघ लागली.सकाळी सकाळी आजी माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मीकांत हांडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व टीमने शाहू छत्रपती यांच्यासह रंगपंचमी उत्साहात पार पाडली.

हौदात रंगवायचय

माजी सैनिकांनी शाहू महाराज यांच्या उपकाराची जाणीव करून देत आम्हाला यावेळी कोणतेही परिस्थितीत शाहू छत्रपतींना निवडून द्यायचा आहे असा निर्धार केला.तर शाहू छत्रपती यांनी या सैनिकांच्या बरोबर मला हौदात रंगपंचमी खेळायचे आहेत त्यांना हौदात बुडवायचा आहे असे सांगत आनंद व्यक्त केला.तर आता विजयात गुलालाच्या रंगातच आम्हाला तुम्हाला भिजवायचा असल्याचेही मत सैनिकांनी व्यक्त केलं. माजी सैनिक बी.जी. पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

संभाजी राजे यांचा रंगपंचमीस नकार

संभाजी राजे छत्रपती यांचे आगमन झाल्यावर मात्र त्यांनी रंग लावण्यास नकार दिला.तुम्हाला जेव्हा खेळायचे तेवढी खेळा पण मला रंग लावायचा असे म्हणत शाहू छत्रपती आणि संभाजी राजे यांना रंग लावला. संभाजी राजे यांची पत्नी संयोगिता राजे यांनी रंगपंचमी बाबत संभाजीरांना विचारले असता पुन्हा संभाजी राजे यांनी नकार दिला तर आपल्याला बाबांनी (शाहू छत्रपती यांनी) रंग लावला असल्याचे संयोगिता राजे यांनी सांगितले.

राधानगरी चे उपकार
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हिंदुराव चौगुले यांनी कार्यकर्त्यांना घेत शाहू छत्रपती यांची भेट घेतली.राधानगरी धरणामुळे राधानगरी तालुक्यात सुजलाम सुफलाम झाला आहे.या उपकाराची परतफेड करायची म्हणून आम्ही सर्वजण तुम्हाला मताधिक्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी त्यांच्यासह
,समन्वयक सुशील पाटील कौलवकर,गोकुळचे संचालक आर के मोरे,मधुकर रामाने,पी डी धुंदरे,मोहन धुंदरे,संजयसिंह पाटील,दत्ताअप्पा पाटील,अशोक पाटील,सुनिल चौगले,प्रवीण पाटील,सरपंच सदाशिव भांदीगरे,युवराज कुसाळे,बाजीराव चौगले यांच्यासह काँग्रेस पक्षाचे तालुक्यातील नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.