रत्नागिरी समाज कल्याण कार्यालयात 25 लाखापेक्षा अधिक रक्कम संशयाच्या भोवऱ्यात
schedule15 Feb 25 person by visibility 336 categoryगुन्हे
रत्नागिरी
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय रत्नागिरी कार्यालयात कोरोना काळात 25 लाखाच्यावर रक्कम परस्पर हस्तगत केल्याचा संशय बळावला आहे. कोरोना काळात सफाई कर्मचारी याच्यावर खर्च केलेली रक्कम नेमकी कोणाच्या घशात गेली याचा शोध घेणे गरजेचे आहे.
कोरोना काळात सर्वच व्यवहार टप्प झाले होते. त्यामुळे शासनासह सर्वसामान्य लोक सुद्धा आर्थिक अडचणी सापडले होते. या संकटाच्या काळात रत्नागिरी समाज कल्याण कार्यालयातील काही लोकांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या नावावर 25 लाखाच्या वर रक्कम हडप केली असल्याचा मोठा प्रकार घडला आहे.
मुलांचे शासकीय वस्तीगृह चिपळूण या ठिकाणी कोणताही सफाई कर्मचारी नसताना तब्बल साडेचार वर्ष याचा पगार कसा निघाला याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. कर्मचारी दाखवला कोण यासह यामध्ये कोण सहभागी आहेत. महिन्याचा महिन्याला पगार कसा निघाला साडेचार वर्षे हा प्रकार कोणत्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या सहवासामुळे घडला हे याची लक्षणे आता दिसू लागली आहेत.
या प्रकरणाची चौकशी केल्यास मुलांचे वस्तीगृह चिपळूण येथील तत्कालीन गृहपाल, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय रत्नागिरी कार्यालयातील तत्कालीन कर्मचारी यापैकी नेमका ठसका कोणाला लागणार, कोरोनाचा मास्क परिधान करून कोण चेहरा लपवतोय, कोणाला ताप येतोय हे अंतिम रिपोर्ट मधून दिसणार आहे. अर्थात ही रक्कम हडप केल्याचे सत्य असून चौकशीच्या रिपोर्टमध्ये ते दिसणार यामध्ये तीळ मात्र ही शंका नाही.
सध्या या विभागाचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे म्हणून कार्यरत आहेत. कोल्हापुरात जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असताना यांच्यावर ज्यादा निधी दिल्या प्रकरणी व साहित्य खरेदी न करता निधी वाटप प्रकरणी चौकशी सुरू आहे. चुकीच्या पद्धतीने निधी दिल्या प्रकरणी यांच्याकडून वसुली करावा असेही त्यांच्या बाबतीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अहवाल सादर केला आहे.