शिलेदार हायकर्स फाउंडेशनतर्फे मोफत शालेय बँगचे वाटप
schedule29 Jan 25 person by visibility 156 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : विक्रमनगरातील किरण विद्या विहार या शाळेत शिलेदार हायकर्स फाउंडेशनतर्फे सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय बँगचे वाटप झाले. अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा जयश्री चव्हाण होत्या. शिलेदार हायकर्स फाउंडेशनचे संचालक नितीन पाटील, सचिन यादव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बँगचे वाटप झाले. रवींद्र नाईक, युवराज खांदारे यांनी संयोजन केले. मुख्याध्यापक संदीप डवंग यांनी शाळेत राबविल्या जाणार्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी सुनील गोविंद पाटील, अमित बांदेकर, प्रवीण देशमुख, सूरज मराठे, प्रमोद महिंद, राहुल पाटील, मोहसीन अब्दुलकरीम बेग, देवेंद्र पाटील, प्रशांत सावर्डेकर, ओंकार साळुंखे, बाबूराव आप्पाजी लोहार, रंजना पाटील, यश पाटील, पार्थ यादव, सृजन पाटील आदी उपस्थित होते.