Awaj India
Register
Breaking : bolt
लोककलांतून उलगडला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपटजुन्याप्रमाणे संच मान्यता चालू ठेवली नाही तर ; गुलाम शिक्षण पद्धतीतून निर्माण होतीलवसा पारंपारिक लोक संस्कृतीचा'" या कार्यक्रमाचे आयोजनसाळोखेनगर डी. वाय.पी.मध्ये रक्तदान शिबिर संपन्नराज्य राखीव पोलीस वर्धापन दिनानिमित्त संचलन परेड सोहळा उत्साहात*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या राज निकमची* *बल्गेरिया येथे रिसर्च इंटर्नशिपसाठी निवड*महिलांनी अन्यायाविरुद्ध लढावे अन्याय करू नये; अनुराधा भोसलेकल्पना मंथन देसाई यांना आदर्श महिला पुरस्कारजयश्री अशोक कुरबेट्टी यांना आदर्श महिला पुरस्कारमनाली सुनील मंडालकर यांना आदर्श महिला पुरस्कार

जाहिरात

 

सम्या सम्या मैफिलीत माझ्या किती हसवशील

schedule23 Feb 25 person by visibility 228 categoryलाइफस्टाइल


कोल्हापूर  (प्रशांत चुयेकर)

हास्य जत्रा फेम समीर चौघुले यांच्या 'सम्या सम्या मैफिलीत माझ्या' या नवीन शो चे नुकताच कोल्हापुरात प्रयोग झाला. दीड तासाचा प्रयोग तब्बल दोन तास सादर करत प्रेक्षकांना हसवून हसवून पोट धरायला लावलं. आई रक्ताची शपथ सम्या सम्या मैफिलीत माझ्या किती हसवशील असं सांगत प्रेक्षकांनी समीर चौघुले यांना दाद दिली.
महाजन पब्लिसिटी यांच्या वतीने गोविंदराव टेंबे रंगमंदिर देवल क्लब कोल्हापूर येथे दोन तास एकपात्री सम्या सम्या मैफलीत माझ्या या धम्माल किसे गप्पा मनोरंजन, कथाकथन या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं.
प्रेम ही संकल्पना घेत प्रेमाच्या पहिल्या भेटीपासून ते लग्नापर्यंतच्या गमतीजमती चौघुले यांनी सादर केल्या.
लग्न म्हणजे काय यावर कोणीतरी म्हटलंय 'साबणाची संपत आलेली जुनी वडी नव्या कोऱ्या साबणाला चिकटवणे आणि साबण मोठा करून पुढील अंघोळ करणे'. काही जणांच्या मते लग्न म्हणजे 'मुंडावळ्या बांधून वाजत गाजत संसाराच्या बाईकवर बसून 'मौत का कुव्वा' मध्ये उडी मारणे, प्रेम हे ट्रेनमध्ये चढताना हुकलेल्या संधीसारखं असत, जे संधीच सोनं करतात त्याना संसाराची विंडोसीट मिळते. तर काही जणांच्या मते प्रेम हे प्राजक्ताच्या सड्यासारखं असत जे नेहेमी पायदळी तुडवलं जातं. काही जणांच्या मते खरं प्रेम म्हणजे 'एखाद जुनं पुस्तक चाळताना सापडलेलं मोराचं पीस'. अशा प्रेममयी वातावरणात विनोदाची अक्षरशा पाऊस पडत चौगुले यांनी प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवलं.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes