Awaj India
Register
Breaking : bolt
*डी वाय पाटील अभियांत्रिकीमध्ये* *'वूमन इन लीडरशिप' कार्यक्रम उत्साहात*सामाजिक कार्यकर्त्या स्नेहल जाधव यांना 'जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीरशिये येथील राजश्री सातपुते यांना 'जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीरसहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल निता रेपे यांना 'आदर्श जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीरसमाजसेविका सुनिता उदाळे यांना 'आदर्श जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीरफार्मासिस्ट पुनम पाटील यांना 'आदर्श जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीरकर्तव्यनिष्ठेचा सन्मान: दिपाली पाटील यांना 'आदर्श जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीरडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा* *मंगळवारी 14 वा दीक्षांत समारंभ*महिला दिनाचे औचित्य साधत एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा राज्यस्तरीय शुभारंभ*रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा! भुदरगडमधील आरोग्य सेविका दीपाली पाटील

जाहिरात

 

मोफत शिक्षणातून वंचित विद्यार्थ्यांना नवी दिशा देणारे शिक्षक – श्री. सुनिल रत्नाकर चौगले

schedule05 Feb 26 person by visibility 194 category


कोल्हापूर :
तिटवे (ता. राधानगरी) येथील श्री. सुनिल रत्नाकर चौगले हे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले आदर्श शिक्षक व मार्गदर्शक म्हणून ओळखले जात आहेत. त्यांचा जन्म 17 ऑगस्ट 1992 रोजी झाला असून ते सध्या तिटवे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर येथे वास्तव्यास आहेत.
शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत गुणवंत असलेल्या श्री. चौगले यांनी M.Sc (Physics) पदवी पूर्ण केली असून ते Ph.D. (Applied) करत आहेत. सध्या ते जनतारा अकॅडेमी, जयसिंगपूर येथे 12 वी विज्ञान शाखा तसेच JEE, NEET, CET, NDA, NATA या स्पर्धा परीक्षांसाठी Physics विषयाचे तज्ज्ञ प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
यासोबतच त्यांनी स्वतःची Guidance Academy (10th, JEE/NEET) या नावाने शैक्षणिक संस्था स्थापन केली असून ते तिचे संस्थापक (Founder) आहेत. या अकॅडेमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत योग्य शैक्षणिक मार्गदर्शन दिले जाते.
शैक्षणिक कार्यासोबतच श्री. चौगले सामाजिक बांधिलकी जोपासत असून, वंचित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, तसेच आई-वडील नसलेल्या पण शिक्षणाची जिद्द असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण व शैक्षणिक मार्गदर्शन देण्याचे मोलाचे कार्य ते करत आहेत. अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो.
त्यांच्या या प्रेरणादायी कार्यामुळे परिसरातील पालक, विद्यार्थी आणि शैक्षणिक क्षेत्रातून त्यांना विशेष सन्मान व कौतुक मिळत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes