Awaj India
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना* *’एसएई इंडिया बाहा’ मध्ये १० पुरस्कार* -*डी वाय पाटील अभियांत्रिकीमध्ये* *'वूमन इन लीडरशिप' कार्यक्रम उत्साहात*सामाजिक कार्यकर्त्या स्नेहल जाधव यांना 'जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीरशिये येथील राजश्री सातपुते यांना 'जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीरसहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल निता रेपे यांना 'आदर्श जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीरसमाजसेविका सुनिता उदाळे यांना 'आदर्श जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीरफार्मासिस्ट पुनम कोरे यांना 'आदर्श जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीरकर्तव्यनिष्ठेचा सन्मान: दिपाली पाटील यांना 'आदर्श जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीरडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा* *मंगळवारी 14 वा दीक्षांत समारंभ*महिला दिनाचे औचित्य साधत एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा राज्यस्तरीय शुभारंभ*

जाहिरात

 

जिल्ह्यातील १३५१ शिक्षक घेणार वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण

schedule01 Jun 25 person by visibility 394 categoryराजकीय

कोल्हापूर करवीर, रुकडी, पेठवडगाव, मुरगूड, गडहिंग्लज सहा केंद्रावर होणार प्रशिक्षण 
 
कोल्हापूर  : राज्यात एकाच वेळी पहिल्यांदा २ जून ते १२ जून पर्यंत वरिष्ठ व निवड श्रेणीचे रियल टाईम प्रशिक्षण होत आहे. कोरोना साथी नंतर पहिल्यांदाच हे प्रशिक्षण ऑफलाइन पद्धतीने होत आहे. जिल्ह्यातील एकूण सहा केंद्रावर हे प्रशिक्षण होणार असून १३५१ शिक्षक प्रशिक्षण घेणार आहे तर १२० शिक्षक सुलभक म्हणजेच प्रशिक्षक प्रशिक्षण देणार आहेत.
        या प्रशिक्षणामध्ये एकूण 300 गुणांची परीक्षा होणार असून या मध्ये किमान 50 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. 50% पेक्षा कमी गुण प्राप्त झाल्यास पुन्हा नव्याने पुढील वर्षी दोन हजार रुपये शुल्क भरून हे प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. प्रशिक्षणात प्रत्येक तासिकेनंतर दहा गुणांची ऑनलाईन चाचणी परीक्षा होणार आहे. यासाठी प्रत्येक प्रशिक्षणार्थीकडे अँड्रॉइड फोन असणे आवश्यक आहे.
     प्रशिक्षणार्थींना राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर 2023, SQAAF, CCE( मूल्यमापन प्रक्रिया ), शिक्षक मार्गदर्शिका पुस्तिका भाग १ ते ५ यासह नवीन शैक्षणिक धोरणाचा सर्वांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.     
       प्रशिक्षणार्थींनी आपण अध्यापन करत असलेल्या वर्गाचे किंवा विषयाची पाठ्यपुस्तके आणि पेनड्राईव्ह ( उपलब्धते नुसार ) सोबत असणे आवश्यक आहे.अशा सूचना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत देण्यात आले आहेत.
         कला व क्रीडा शिक्षकांचे पहिल्या सात दिवसांचे प्रशिक्षण नमूद केलेल्या केंद्रावर ती होईल व पुढील तीन दिवसांचे प्रशिक्षण आदर्श गुरुकुल विद्यालय मिणचे रोड, पेठ वडगाव या ठिकाणी होणार आहे.
 
 
 जिल्हास्तरीय प्रशिक्षणाची संपूर्ण तयारी झाली असून सहा केंद्रावरती प्रशिक्षण पार पडेल.तसेच या प्रशिक्षणातील तीन दिवसांचे कला व क्रीडा शिक्षकांचे पाच जिल्ह्याचे विभागीय प्रशिक्षण कोल्हापूरात होणार आहे. त्याचे नियोजन करण्यात आले आहे.
डॉ. राजेंद्र भोई, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes