Awaj India
Register
Breaking : bolt
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दुग्ध व्यवसायातून ‘गोकुळ’शी ऋणानुबंध कायम ठेवावा - नविद मुश्रीफडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा* *‘ब्रह्माकुमारी’ सोबत सामंजस्य करार*आर्किटेक्चर नंतर करिअरच्या* *अमर्याद संधी - डॉ. ए. के. गुप्ता*नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कधी भरपाई देणार**डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये* *शनिवारी ‘डायबेटिक फूट’वर परिषद*अतिसार थांबवा अभियान’ प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी अमोल येडगे*खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचा १०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण* :वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कडून विविध विषयांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा*वनस्पतीच्या वाढीसाठी मुळांचे आरोग्य महत्वाचे – प्रा. डॉ. के. प्रथापन* चुये येथे बेंदूर सण उत्साहात साजरा

जाहिरात

 

बँकेची लढाई सुज्ञ सभासदांनी हातात घेतल्यामुळे विजय निश्चित : वरुटे

schedule01 Jul 22 person by visibility 1149 category

सुज्ञ सभासद विरोधकांना जागा दाखवतील- राजाराम वरुटे,

विरोधकांच्यात समन्वय नसल्याने विजय निश्चित. मुरगूड ता. कागल शिक्षक संघ सत्तारूढ पॅनेलचा प्रचार मेळावा

 कोल्हापूर/प्रतिनिधी 
 केवळ आम्हाला विरोध म्हणून एकत्र आलेल्या विरोधकांची निवडणूक लढण्या पूर्वीच बिघाड झाल्यामुळे सुज्ञ सभासद याना सपशेल नाकारतील. विरोधकांच्यात समन्वय नसल्याने त्यांच्या हाती बँकेची सत्ता दिली तर बँकेवर 2009 पूर्वीची परिस्थिती ओढवल्याशिवाय राहणार नाही.बँकेची अस्मिता जपण्यासाठी सुज्ञ सभासदांनी ही लढाई हातात घेतल्यामुळे सत्तारूढ पॅनेलचा विजय निश्‍चित असल्याचे शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष,पॅनेलप्रमुख राजाराम वरुटे म्हणाले. 


 ते मुरगुड ता.कागल येथे प्रचार मेळाव्याप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी सुकाणू समितीचे नेते शिवाजी पाटील होते. वरुटे म्हणाले, विरोधकांनी खोटी पत्रकबाजी करून सभासदांची दिशाभूल चालू केली आहे.२००९ पूर्वीची बँकेची स्थिती व सध्याची स्थिती सभासद जाणून आहेत. रिझर्व्ह बँकेने सोसायटी करण्याचे निर्देश दिले असताना 2009 साली सत्तेत आलेल्या संचालक मंडळाने धोरणात्मक निर्णय घेऊन काटकसर व पारदर्शक कारभार करून बँक वाचवली हे सभासद कदापि विसरणार नाहीत सभासदा समोर स्वच्छ कारभाराचा आरसा ठेवला आहे. विरोधात एल्गार करणाऱ्यांचा बुरुज केव्हाच ढासळला आहे. त्यामुळे ते ही खिंड लढवू शकत नाहीत,हे सभासदांनी केव्हाच ओळखले आहे. विरोधकांच्यातील असमन्वय, कटकारस्थान, पूर्वेतिहास सभासदांना ज्ञात असल्यामुळे या वाचाळवीर मंडळींना सभासद जवळ करणार नाहीत असेही ते म्हणाले. 

यावेळी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष संभाजी बापट म्हणाले विरोधक खोटी पत्रकबाजी करून शिक्षकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण या खोट्या सहानुभूती ला सभासद कदापिही थारा देणार नाहीत. शिक्षक संघाच्या संचालकांनी बँकेमध्ये आदर्शवत कारभार करून स्वच्छ कामाची चौकट घालून दिली आहे. 

बँकेचे चेअरमन बाजीराव कांबळे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची आर्थिक अस्मिता असणाऱ्या तमाम सभासदांची विरोधकांनी थट्टा चालू केली असून खोटी आकडेवारी सादर करून किमान 1 मत तरी द्या अशा विनवण्या चालू आहेत. पण अशा प्रवृत्तीला सभासद हद्दपार केल्याशिवाय राहणार नाहीत. सत्तारूढ शिक्षक संघ प्रणित पॅनेल ला मिळत असलेला उदंड प्रतिसाद पाहून विरोधकांची दमछाक झालेली आहे. त्यामुळे ते बेताल वक्तव्य करत आहेत. 

यावेळी सुकाणू समितीचे शिवाजी पाटील, कागल तालुक्याचे उमेदवार पांडुरंग रावण,माजी संचालिका कावेरी चव्हाण,गजानन गुंडाळे,शिक्षक सेनेचे कृष्णात धनवडे, पेंशन संघटनेचे सर्जेराव सुतार यांची भाषणे झाली. कार्यक्रमास माजी संचालक वसंत जाधव, प्रवीण अंगज, दस्तगीर फकीर, उत्तम पाटील,बाबाजान पटेल,आर बी जाधव, विश्वनाथ डफळे, विजय पाटील, संदीप शिंदे, आनंदा पाटील, शिवाजी देवाळे, एच. एन. पाटील, विलास पोवार,ए एम पाटील, शिवाजी पाटील, पांडुरंग ननवंरे, आर.डी. जाधव, उत्तम पाटील, जयवंत हावळ, महिला कार्यकर्त्या रेखा चव्हाण, माजी संचालिका कावेरी चव्हाण, मनीषा पाटील, सुरेखा पवार, आमीनाबी पटेल ,सविता पाटील, वैशाली मांडे, सारिका रामसे, यासह सत्तारूढ शिक्षक संघाचे सर्व उमेदवार,शिक्षक संघाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे स्वागत कागल तालुक्याचे सर्वसाधारण गटातील उमेदवार पांडुरंग रावण व वसंत जाधव यांनी प्रास्ताविक विद्यमान संचालक जी एस पाटील, सूत्रसंचालन विश्वनाथ डफळे, संदीप डफळे, राहुल कुंभार ,संदीप शिंदे तर आभार उत्तम पाटील यांनी मानले

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes