+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustपेन्शनसाठी हजारो दिव्यांग आक्रोश मोर्चात सहभागी होणार adjustबालिंगा येथील जूना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद* adjustपूरबाधित नागरिकांसाठी निवारा केंद्राचा प्रस्ताव तयार करा : adjustपाण्यात बसून शिकतायेत पणोरे गावची मुले adjustशिवाजी विद्यापीठाच्या तीन दिवसाच्या परीक्षा पुढे ; भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या मागणीला यश adjustविकसीत भारतासाठी योग्य अर्थसंकल्प adjustविद्यार्थीनींना मिळाली आरोग्य रक्षणाची माहिती adjustखोटी आश्वासने देणारे लॉलिपॉप बजेट! adjustजिल्ह्यातील 78 बंधारे पाण्याखाली* *राधानगरी धरणातून 1500 क्युसेक विसर्ग* adjustराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यादिवशी ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी*
schedule20 Mar 24 person by visibility 2621 categoryराजकीय


उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जागा वाटपचा तिढा अजून सुटलेला दिसत नाही. हातकणंगले लोकसभा मतदार संघातील प्रबळ दावेदार असताना तो मतदारसंघ सोडला जातो.दुसरीकडे सांगली लोकसभा मतदारसंघात काही नसताना त्या मतदारसंघावर दावा केला जातो. त्यामुळे उद्धव साहेब या दोन्ही मतदारसंघातल्या गणित चुकते असं , सध्या चित्र निर्माण झाले आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघात आमदार विश्वजीत कदम यांनी उमेदवारी नाही मिळाल्यास बंड करणार असल्याचें सांगितले.150 ग्रामपंचायती दहा जिल्हा परिषद सदस्य पंचवीस पंचायत समिती सदस्य सहा साखर कारखान्याचे चेअरमन इतके संख्याबळ असतानाही या ठिकाणी काँग्रेसला मतदारसंघ हवा होता.ठाकरे शिवसेनेकडे एकही ग्रामपंचायत नाही तरी हा मतदारसंघ त्यांना मिळत आहेत त्यामुळे आम्ही बंडखोर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 हातकणंगले लोकसभा मतदारसंघात डॉक्टर सुजित मिणचेकर,सत्यजित पाटील,उल्हास पाटील
हे तीन माजी आमदार शिवसेना ठाकरे गटाचे आहेत.सोबत महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,मानसिंग नाईक,आमदार राजू आवळे यांची सोबत आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांना पाठिंबा दिला आहे. शेट्टी यांनी महाविकास आघाडी सोबत न येता त्यांनी पाठींबा द्या असं सांगितलं आहे.काँग्रेस राष्ट्रवादीच्या सोयीसाठी इतर लोकसभा मतदारसंघात पाठिंबा मिळावा यासाठी शेट्टी यांना पाठिंबा दिला असल्याचे सांगितले जाते.

उद्धव ठाकरे यांच्या समोर पेच
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे बळ असले तरी या गटाच्या तीन माजी आमदार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी विरोध दर्शवला आहे.इतरही शेतकरी संघटनेचे नेते ठाकरे यांच्या संपर्कात आहेत. माजी आमदार निवडणुकीत तयार नसतील तर शेतकरी संघटनेच्या एका कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन मतदारसंघ पुन्हा बळकट करावा अशी मागणी येथील शिवसेनिकांची होत आहे.

तर कोल्हापुरात ही होणार बंड
सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळालेला आहे.हा काँग्रेसला बालेकिल्ला असून मतदारसंघ काँग्रेसला पुन्हा मिळावा अन्यथा आम्ही बंड करणार असल्याचे आमदार विश्वजीत कदम यांनी सांगितलं आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाटेला आला होता मात्र तो काँग्रेसने घेतला.सांगली तसे झाल्यास कोल्हापूरला सुद्धा आम्ही बंड करूअसे शिवसैनिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर मत व्यक्त केले.

उद्याच्या बैठकीकडे लक्ष
उद्या शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांनी याबाबतचा विचार करावा असेही हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनिकांनी सांगितले आहे. उद्याच्या बैठकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा विचार लक्षात घेतल्यास पॉझिटिव्ह चर्चा होईल, असेही एका शिवसैनिकांने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.